सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण अग्रण धुळगाव येथे विहिरीत पडलेल्या पुतणीला वाचविताना काकासह पुतणीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. मनोज भास्कर शेसवरे (वय ४३) आणि सौंदर्या वैभव शेसवरे (१६. दोघेही रा. अग्रण धुळगाव) अशी मृतांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटनेची अधिक माहिती अशी की, मंगळवारी अग्रण धुळगाव येथील शेसवरे मळा येथे राहत असलेली सौंदर्या व तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या, पाणी आणण्यासाठी माय-लेकी दोघीही विहिरीत उतरल्या. विहिरीत उतरलेल्या सौंदर्याने कळशीत पाणी भरले व वरती येत असतानाच अचानक पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. काही समजण्याच्या आतच ती विहिरीत पडल्याने सौंदर्याच्या आईने आरडाओरडा केला. तेवढ्यात सौंदर्याचा चुलते मनोज शेसवरे हे घटनास्थळी धावत आले. सौंदर्या विहिरीत पडलेली पाहून त्यांनी तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि तिला पाण्याबाहेर काढले. सौंदर्याला उचलून पाण्याबाहेर घेऊन येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले. घाबरलेल्या सौंदर्याने मनोज यांना पाण्यामध्ये मिठी मारली. यामुळे मनोज यांना हातपाय हलवता आले नाहीत. यामुळे दोघेही विहिरीत पुन्हा पडले.

हेही वाचा – शरद पवार राजकारणापासून लांब जात आहेत का? संजय राऊत म्हणतात, “माझ्या माहितीप्रमाणे…!”

सौंदर्याच्या आईने परत आरडाओरड केली. आवाज ऐकून आले शेजारी असलेल्या वस्तीवरील ग्रामस्थ घटनास्थळी धावले, पण तोवर उशीर झाला होत, सौंदर्यासह मनोज यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दोघांच्याही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In shirdhon agran dhulgaon uncle along with niece also drowned in water ssb
Show comments