ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या तर जिल्ह्यात अन्य ठिकाणी किरकोळ बंद ठेवण्यात आला.
गणेशोत्सव काळात हा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यात शाळकरी मुलांचे सुद्धा मोठे हाल झाले आहेत. वस्त्यासाठी गेलेल्या बसने प्रवाशी विद्यार्थी शहरात आले असून माघारी जाण्यासाठी त्यांना बसफेरी नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने संप मिटवावा अशी मागणी होत आहे.
सावंतवाडी आगार पूर्णपणे बंद असून कणकवली व कुडाळ आगारांमधील आतापर्यंत तीन-तीन फेऱ्या सुटलेल्या नाहीत. उर्वरित वाहतूक सुरू आहे अशी माहिती विभाग नियंत्रकानी दिली आहे.
© The Indian Express (P) Ltd