सोलापूर : शहरातील मुळेगाव रोडवर सरवदे नगरात राहत्या घरात एका महिलेने आपल्या दोन्ही जीवांना गळफास देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दुपारी उजेडात आला. स्नेहा संतोष चिल्लाळ (वय २८), संध्या संतोष चिल्लाळ (वय ११) मनोजकुमार संतोष चिल्लाळ (वय ७) या तिन्ही मायलेकांचे मृतदेह घरात छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
हेही वाचा…माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या वाहनावर चक्क गाजरांचा पाऊस
दुपारी स्नेहा हिचा पती संतोष चिल्हाळ घरी परतला तेव्हा हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ सरवदे नगरात धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. एमआयडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही.