सोलापूर : यापूर्वी स्थगित करण्यात आलेले सोलापूर विमानतळाचे लोकार्पण रविवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. मात्र या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे एकमेव आमदार सुभाष देशमुख यांचा अपवाद वगळता अन्य दहा आमदारांसह दोन्ही खासदारांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोलापूर विमानतळाचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते झाले असले तरी जिल्हा प्रशासनाने या समारंभाचे थेट प्रक्षेपण विमानतळावर केले होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि सोलापूरचे माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे उपस्थित होते. मात्र महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हे दोघांसह भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील हे अकलूजमध्ये महाराष्ट्र ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित असल्याने ते विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यास हजर राहू शकले नाहीत.
हेही वाचा : गणपतीपुळे समुद्रात जिंदाल कंपनीचे तिघे बुडाले; दोघांचा बुडून मृत्यू, एकाला वाचविले
सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे, माळशिरसचे आमदार राम सातपुते या भाजपच्या पाच आमदारांसह बबनराव शिंदे (माढा), संजय शिंदे (करमाळा), यशवंत माने (मोहोळ) या तिघा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांसह बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि सांगोल्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील अशा सर्वांनी सोलापुरातील पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणालीद्वारे झालेल्या विमानतळ लोकार्पण सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे विमानतळ लोकार्पण सोहळ्यापूर्वी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख या दोन्ही भाजपअंतर्गत विरोधकांनी सोलापूर विमानतळाची एकत्रपणे पाहणी केली होती. तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमवेत सोलापूर विमानतळास भारतीय नागरी विमान वाहतूक संचालनालयाची परवानगी मिळण्यासाठी नवी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली होती.
हेही वाचा : कास पठारावर पर्यटकांची गर्दी; पुन्हा वाहतूक कोंडी
सोलापूर जिल्ह्यात सध्या सर्वच्या सर्व दहा आमदार महायुतीचे आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या एकमेव काँग्रेसचे आमदार होत्या. सोलापूर लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.