सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचंड नाराज होऊन बंडाच्या तयारीला लागलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते व त्यांच्या कुटुंबीयांची समजूत घालण्यासाठी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील असताना इकडे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मतदारसंघात गावभेटीच्या नावाखाली प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यामुळे माढ्यातील राजकीय घडामोडींविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सोमवारी दिवसभर धैर्यशील मोहिते-पाटील माढा मतदारसंघाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या करमाळा तालुक्यातून प्रचाराला प्रारंभ केला. करमाळा विधानसभा मतदारसंघ त्यांचे कट्टर विरोधक अजितनिष्ठ अपक्ष आमदार संजय शिंदे यांचा आहे. याच भागातून मोहिते-पाटील यांनी प्रचाराला सुरूवात करण्यापूर्वी तेथील प्रसिध्द कमलादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. करमाळा शहरात आमदार संजय शिंदे यांचे सहकारी सुनील सावंत गटाने धैर्यशील मोहिते-पाटील यांना पाठिंबा दिला आहे. भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीचा किंवा अन्य कोणताही तगडा उमेदवार उभा राहिल्यास त्याला आपला पाठिंबा राहणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. पोथरे, कामोणे, बिटरगाव, आळजापूर, खडकी, जातेगाव, पुनवर, वडगाव आणि मांगी या गावांना भेटी देऊन मोहिते-पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधत सर्वांचे मनोगत जाणून घेतले. या गावभेटीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. याच तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंत जगताप हे मोहिते-पाटील यांच्या संपर्कात आहेत.

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

हेही वाचा : “भाजपाचं लक्ष्य स्पष्ट, पण बंदूक अजित पवारांच्या खांद्यावर”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचा पलटवार

माढ्यात भाजपच्या उमेदवारीसाठी विद्यमिन खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. परंतु मोहिते-पाटीलविरोधी समविचारी आघाडीचा आधार घेत भाजपने खासदार निंबाळकर यांना पुनःश्च उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रचंड नाराज झालेले मोहिते-पाटील गटाने दबाव टाकत डावपेच आखले. त्याचाच भाग म्हणून अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर, त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण , शेकापचे सरचिटणीस, आमदार जयंत पाटील (अलिबाग), सांगोल्यातील शेकापचे नेते डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, जयवंत जगताप आदींनी मोहिते-पाटील कुटुंबीयांशी खलबते केली होती. त्यातून राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच भाजपचे नेते, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ अकलूजमध्ये धाव घेऊन मोहिते-पाटील यांच्याशी दीड तास बंद खोलीत चर्चा केली. मोहिते-पाटील यांनी पक्षाला परवडणारी नसल्याचे महाजन यांनी जाहीरपणे सांगितले होते.

हेही वाचा : सांगली : पहिलीतील मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला अटक

या पार्श्वभूमीवर काल रविवारी रात्री माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे आमदार संजय शिंदे यांच्या शेतघरात मोहिते-पाटीलविरोधी समविचारी आघाडीची बैठक झाली. त्यानंतर तिस-या दिवशी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत रामराजे निंबाळकर व त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांना महायुती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही रामराजे निंबाळकर यांची मिन्नतवारी केली. परंतु पुढील भूमिका फलटण भागात कार्यकर्ते व हितचिंतकांची बैठक घेऊन ठरविणार असल्याचे रामराजे निंबाळकर यांनी सांगितल्याची माहिती पुढे आली. याच पार्श्वभूमीवर इकडे माढ्यात धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गावभेटींच्या माध्यमातून प्रचार सुरू केल्यामुळे माढ्यात काय होणार, याबद्दल सार्वत्रिक उत्सुकमा कायम राहिली आहे.