सोलापूर : एका मतिमंद आणि दिव्यांग महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोषी आरोपीला सोलापूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
गणेश अभिमन्यू माने (वय ४२, रा. उत्तर सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या नातेवाइकांच्या फिर्यादीनुसार सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील पीडिता ही मतिमंद आणि दिव्यांगदेखील आहे. ६ डिसेंबर २०२० रोजी रात्री पीडिता ही तिच्या घरातील खोलीत झोपली असता आरोपी गणेश माने याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा सरकार पक्षाचा आरोप होता.
हेही वाचा : चामड्याऐवजी आता सिंथेटिक तबला ! मिरजेत निर्मिती, वातावरण बदलाने बिघडणारा ताल दुरुस्त
u
या खटल्याच्या सुनावणीत सरकारच्यावतीने ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेचा भाऊ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारच्यावतीने ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ॲड. सागर पवार यांनी काम पाहिले.