सोलापूर : खोट्या माहितीच्या आधारे धमकावत एका डॉक्टर महिलेकडून ६७ लाख २४ हजार रुपये उकळणाऱ्या मुंबईच्या दोघा सायबर गुन्हेगारांना सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या पथकाने सापळा रचून अटक केली. सोलापुरात राहणाऱ्या पीडित महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील आपल्या भावाच्या घरी वास्तव्यास असताना मोबाईलवरून, मी मुंबई गुन्हे शाखेतून बोलतो, तुम्ही सिमकार्डद्वारे अश्लील चित्रफिती आणि माहिती पाठविल्याप्रकरणी मुंबईत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, हे प्रकरण विश्वास नांगरे-पाटील हाताळत आहेत. तुझे कॅनरा बँकेत खाते आहे. आधारकार्ड कोठे वापरले ? आधारकार्ड लोकांना का दिले ? त्याचे नियम तुम्हाला माहित नाहीत काय, असे म्हणून कॅनरा बँकेतील खात्याचा तपशील विचारून घेतला. नंतर पीडित डॉक्टर महिलेशी वारंवार संपर्क साधून अटकेची भीती दाखविली. या माध्यमातून पुन्हा पुन्हा धमकावत त्यांच्या वेगवेगळ्या चार बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ६७ लाख २४ हजार रुपये उकळण्यात आले.

हेही वाचा : सातारा शहरात कॉम्प्रेसर फुटून भीषण स्फोट; एक ठार, दोन जखमी

Gwalior PWD Employee Molests Girl Video Viral
VIDEO : नोकरीच्या बहाण्याने रेस्ट रुममध्ये बोलावणाऱ्या उपअभियंत्याला तरुणीने दिला चपलेचा प्रसाद; बघा कशी केली पोलखोल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
online fraud of Rs 57 lakhs with senior citizen women on pretext of extra returns
जादा परताव्याच्या अमिषाने वृद्धेची ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ५७ लाखांची फसवणूक
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
Cyber-fraud with a woman, Mumbai, financial fraud,
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकल्याची भीती दाखवून महिलेची सायबर फसवणूक
Kuwait Bank Fraud: Kerala Nurses Under Scrutiny
Kerala Nurses Fraud : १४०० नर्सेस, ७०० कोटी आणि गल्फ बँक… कुवेतमधील अर्थिक घोटाळ्याचे काय आहे केरळ कनेक्शन?

शेवटी, हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येताच पीडित डॉक्टर महिलेने शहर पोलीस आयुक्तालयात सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सायबर गुन्हेगारांच्या मोबाईलवर ट्रेकिंग लावत त्यांचा शोध घेतला. यात संबंधित दोघे सायबर गुन्हेगार असून सोलापूरकडे येत असताना वाटेत सावळेश्वर टोल नाक्याजवळ एका प्रवासी बसमध्ये त्यांना पकडण्यात आले. या टोळीत आणखी तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग असून त्याचा शोध सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा हे करीत आहेत.

Story img Loader