सोलापूर : खोट्या माहितीच्या आधारे धमकावत एका डॉक्टर महिलेकडून ६७ लाख २४ हजार रुपये उकळणाऱ्या मुंबईच्या दोघा सायबर गुन्हेगारांना सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या पथकाने सापळा रचून अटक केली. सोलापुरात राहणाऱ्या पीडित महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील आपल्या भावाच्या घरी वास्तव्यास असताना मोबाईलवरून, मी मुंबई गुन्हे शाखेतून बोलतो, तुम्ही सिमकार्डद्वारे अश्लील चित्रफिती आणि माहिती पाठविल्याप्रकरणी मुंबईत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, हे प्रकरण विश्वास नांगरे-पाटील हाताळत आहेत. तुझे कॅनरा बँकेत खाते आहे. आधारकार्ड कोठे वापरले ? आधारकार्ड लोकांना का दिले ? त्याचे नियम तुम्हाला माहित नाहीत काय, असे म्हणून कॅनरा बँकेतील खात्याचा तपशील विचारून घेतला. नंतर पीडित डॉक्टर महिलेशी वारंवार संपर्क साधून अटकेची भीती दाखविली. या माध्यमातून पुन्हा पुन्हा धमकावत त्यांच्या वेगवेगळ्या चार बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ६७ लाख २४ हजार रुपये उकळण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा