सोलापूर : शालेय जीवनात सर्वात मोठा टप्पा समजल्या जाणा-या दहावीच्या परीक्षेसह अन्य कोणत्याही परीक्षांमध्ये मुलीच हुशार असल्याचे वारंवार दिसून येते. सोलापुरातही दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये मुलींनीच बाजी मारली असताना दुसरीकडे लहानसहान नोकरीसह संसाराचा गाडा ओढणा-या पाच प्रौढ महिलांनी संकोच न बाळगता दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत पाचही महिलांनी उत्तमप्रकारे बाजी मारली आहे. त्यांचे यश कौतुकाचा विषय ठरला आहे. नदिनी देशमुख (वय ३०) यांनी दहावी परीक्षेत ७८ टक्के गुणांची कमाई करीत यश संपादन केले आहे. तर संगीता पारशेट्टी (वय ५०) या गृहिणीने ७१.२० टक्के गुण मिळविले आहे. संगीता थोरात (वय ४६) यांनी ४३.४० टक्के, दीपाली तोडकर (वय २५) यांनी ७७.२० टक्के तर सारिका वाघमारे (वय ३४) यांनी ६९.२० टक्के गुण मिळवून दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

यापैकी सारिका वाघमारे यांनी शिक्षणाचा ध्यास कायम ठेवत स्वतःच्या मुलीसोबत नीटची परीक्षा देण्याचा मनोदय बोलून दाखविला आहे. त्यांना दोन अपत्ये आहेत. मोठी मुलगी बारावी वर्गात शिकत आहे. ती सध्या नीट परीक्षेची तयारी करीत असून तिच्यासोबत आपणही नीट परीक्षेची तयारी करीत असल्याचे सारिका वाघमारे यांनी सांगितले. अंगणवाडी केंद्रात मदतनीस आसलेल्या संगीता थोरात यांना शिक्षणाचे महत्व कळले आहे. त्यांना पुढील शिक्षण घेऊन पदोन्नती घ्यावयाची आहे. म्हणूनच त्यांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण करून पुढील शिक्षणाचा पाया रचला आहे.

Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
mentally challenged woman , mother,
आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न
Image of a woman trainer in a gym or swimming pool
Women Trainers In Gym : जिम, जलतरण तलावांमध्ये महिला प्रशिक्षक बंधनकारक, प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

हेही वाचा : सातारा: अपघाताचा बनाव करून खून प्रकरणी चार जणांना अटक

नंदिनी देशमुख यांनी दहावीचा अभ्यास यू ट्यूबच्या आधारे केला होता. त्या म्हणाल्या, माझी मुले शिकून मोठी होतील. पण मला अडाणी म्हणून जगायचे नाही. पुढचे शिक्षणही संकुचितपणा न बाळगता जिद्दीने घेणार आहे. संसाराचा गाडा हाकत दहावीची परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या य सर्व पाच महिलांना त्यांच्या घरातील मंडळींसह सोलापुरात बालभारती शिक्षण संस्थेचे संचालक शब्बीर शेख यां नी दिलेले प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे. शेख म्हणाले, परिस्थितीमुळे समाजात आजही अनेक मुला-मुलींना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते. मुलींच्या गळतीचे प्रमाण तर जास्त आहे. परंतु वय वाढल्यानंतर संसाराचा गाडा हाकताना शिक्षणाचे महत्व कळते. शिक्षणासाठी वयाची अट नसते. कोणत्याही वयात शिक्षण घेता येते. त्यासाठी मानसिक तयारी असावी लागते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून वृध्दापकाळात पदवी शिक्षण घेणा-यांची अनेक उदाहरणे आहेत.

Story img Loader