सोलापूर : कर्नाटकातून मोटारीने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घालून चौघा जणांना हिरावून घेतले. तर सहा जण जखमी झाले. यात आठ महिन्यांची मुलगी आश्चर्यकारकरीत्या बचावली. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास भाविकांची तवेरा गाडी आणि कंटेनरची धडक हा अपघात घडला.

श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्योती दीपक हुनशामठ (३८ रा. कलबुर्गी) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) अशी मृतांची नावे आहेत. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशैल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) आणि तवेरा चालक श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. अपघातानंतर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली पालथी होऊन अक्षरशः चक्काचूर झाली. अपघातानंतर कंटेनर चालकाने पलायन केले.

Yogi Adityanath First Reaction
Stampede in Kumbh Mela : योगी आदित्यनाथ यांना अश्रू अनावर; म्हणाले,”चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा बळी जाणं…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
Yashomati Thakur warned that distributing trishuls could lead to violence and threaten law and order
अमरावती जिल्ह्यात काही संघटनाकडून शस्त्रांचे वाटप, यशोमती ठाकूर यांचा आरोप
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
Maharashtra Two Tiger Death, Tiger Death, pench ,
राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू
Abhijeet Adsul , Shivsena , Amravati, Ravi Rana ,
“महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…

हेही वाचा : अजित पवारांच्या आव्हानाचं दडपण आहे का? अमोल कोल्हे म्हणाले…

कर्नाटकतील कलबुर्गी, हुबळी, बागलकोट भागातील एकमेकांचे नातेवाईक असलेले भाविक देवदर्शनासाठी तवेरा गाडीतून प्रवास करीत होते. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर हे भाविक तुळजापुरात मुक्काम करून बार्शी-परांडा-करमाळामार्गे पुढे शिर्डीकडे जाण्यासाठी निघाले होते. करमाळा तालुक्यातील पांडे गावच्या हद्दीत तवेरा व कंटेनर यांची जोरात धडक झाली. अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना करमाळ्यातील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader