सोलापूर : राज्यातील मराठा समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊन उपकार फेडायचे नसल्यास उपकार फेडू नये. पण मराठा आरक्षणाला निदान विरोध तरी करू नये. कारण आरक्षणाची ही पहिली आणि शेवटची लढाई सामान्य मराठा माणसांनी खंबीरपणे हाती घेतली आहे, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बजावले आहे. शनिवारी, अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात मराठा आरक्षण प्रश्नावर आयोजित विराट सभेत जरांगे-पाटील हे बोलत होते. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठा आरक्षणाला भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विरोध करीत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांचाही आक्षेप आहे. त्याकडे लक्ष वेधताना जरांगे यांनी, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या कोणाही नेत्याचा नामोल्लेख टाळून त्यांना आरक्षणाला विरोध न करण्याचे स्पष्टपणे बजावले. याचवेळी मराठा समाजाला चोहीबाजूंनी घेरण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हे षडयंत्र तमाम मराठा समाजाने एकजीव होऊन तोडायचे आहे. त्यासाठी ही अंतिम लढाई असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

हेही वाचा : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची राहत्या घरी आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने वेळ घेतला आहे. आपणही सरकारला मुदत दिली होती. परंतु आता सावध राहावे लागणार आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्यात अडचण काय, असा सवाल जरांगे-पाटील यांनी केला. पणजोबा-खापरपणजोबांपासून मराठा समाज शेती करीत आला आहे. पूर्वी शेतीला कुणबी म्हटले जायचे. कुणबीचा सुधारीत शब्द शेती झाला. असे पूर्वीचे अनेक शब्द सुधारीत होऊन नवीन झाले आहेत. पायताण्यापासून चप्पल, हाॅटेलपासून रेस्टाॅरंट अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणून मग चप्पल म्हटली जाणारे पायताण कोणी वापरायचीच नाही का, असाही सवाल उपस्थित करीत, अन्याय सहन करणाऱ्या मराठा समाजाच्या ताटात आता कोणीही माती घालू नये, असे आवाहन त्यांनी केले.