सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावात एका विहिरीत एका महिलेसह तिच्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

चित्रा बाळासाहेब हाक्के (वय २८) व तिची मुले पृथ्वीराज (वय ५) आणि स्वराज (वय २) अशी या दुर्घटनेतील दुर्दैवी मायलेकांची नावे आहेत. चित्रा हाक्के ही वांगी गावात कुटुंबीयांसह राहात होती. ती आपल्या दोन्ही मुलांसह विहिरीकडे कशासाठी गेली होती ? हा प्रकार आत्महत्येचा की अपघाती, हे स्पष्ट झाले नाही. सोलापूर तालुका पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

गेल्या आठवड्यात सांगोला तालुक्यातील डिकसळ गावात एका विवाहित महिलेने आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकून नंतर स्वतः विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे.

Story img Loader