सोलापूर : एसटी बसमधून प्रवास करताना एका तरुणाने अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीजवळ घडला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून एसटी बस थेट पोलीस ठाण्यात नेऊन त्या तरुणाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार रमेश सुबराव बनसोडे (रा. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बारामतीहून बार्शीकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये हा प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Devendra Fadnavis : अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा!

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह आपल्या गावी जाण्यासाठी बारामती बार्शी एसटी बसमधून प्रवास करीत होती. इंदापूर-टेंभुर्णीमार्गे ही बस बार्शीच्या दिशेने येत असताना पीडित अल्पवयीन मुलीच्या आसनाजवळ बसून विकृत मनोवृत्तीचा तरुण तिच्याशी गोड बोलत, आपल्या स्मार्टफोनवरून अश्लील चित्रफीत दाखवत होता आणि आक्षेपार्ह वर्तन करीत असल्याचे पाहून पीडित मुलीने आई-वडिलांचे लक्ष वेधले. तेव्हा घडलेला प्रकार पाहून संतापलेल्या आई-वडिलांसह अन्य सहप्रवाशांनी एसटी बस चालक आणि वाहकाला बस थेट पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितले. त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात बस गेल्यानंतर पोलिसांना घडलेली घटना कथन करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच संशयित म्हणून रमेश बनसोडे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.