सोलापूर : दुपारी उन्हात झाडाखाली थांबलेल्या एका वृद्ध महिलेला दोघा भामट्यांनी तिच्या पायाजवळ सोन्याचे बिस्कीट पडल्याचे भासवून ते बिस्कीट तिला दिले आणि त्या मोबदल्यात तिच्या अंगातील सोन्याचे दागिने काढून पोबारा केला. दिलेले सोन्याचे बिस्कीट लोखंडाचे निघाले. हा फसवणुकीचा प्रकार मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळ येथे घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याच मोहोळ तालुक्यात हिवरे येथेही एका वृद्ध महिलेला लुटण्याचा प्रकार दोनच दिवसांपूर्वी घडला होता. वत्सला काशीनाथ जवंजाळ (वय ६० रा. वाफळे, ता. मोहोळ) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यदीनुसार त्या दुपारी उन्हात चिंचेच्या झाडाखाली एकट्या थांबल्या होत्या. तेव्हा अन्य दोघे तरूण तेथे येऊन थांबले. त्यांनी वत्सलाबाईंच्या पायाजवळ पडलेला हातरूमाल उचलून त्यात सोन्याचे बिस्कीट असल्याचे सांगितले. वत्सलाबाईंनी हे सोन्याचे बिस्कीट नाही, असे सांगितले असता त्या दोन तरूणांनी, हे सोन्याचे बिस्कीट आपण वाटून घेऊ, असे सांगितले. येथे पोलीस असल्याचे सांगत त्या दोघांनी वत्सलाबाईंना तेथून थोड्या अंतरवर नेले. सोन्याचे संपूर्ण बिस्कीट तुम्ही घ्या आणि त्या मोबदल्यात तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने आम्हाला द्या, अशी भुरळ पाडून त्या दोघा तरूणांनी वत्सलाबाईंच्या गळ्यातील १२ ग्रॕम सोन्याचे दागिने काढून घेतले. नंतर वत्सलाबाईंनी घरी येऊन ते बिस्कीट सोन्याच्या खरेपणाची खात्री केली असता ते बिस्कीट सोन्याचे नव्हे तर लोखंडाचे निघाले.

हेही वाचा: सांगली: नूतन खासदारांकडून आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती

हिवरे येथे रानात दुपारी शेळ्या राखत थांबलेल्या रंभा श्रीमंत कसबे (वय ६१) यांच्या तोंडाला टाॕवेल बांधून व मारहाण करून एका चोरट्याने त्यांच्या अंगावरील – ग्रॕम सोन्याचे दागिने बळजाबरीने लुटून नेले होते. त्यापाठोपाठ मोहोळ येथे वेगळ्या गुन्ह्याची पध्दत वापरून अन्य एका वृद्ध महिलेला गंडविण्याचा प्रकार घडला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur old woman s gold ornaments stolen with the lure of gold biscuit css
Show comments