सोलापूर : राज्यातील प्रमुख मोठ्या धरणांपैकी उजनी धरणातील गाळ काढण्याबाबत शासनाने दुस-यांदा गठीत केलेल्या समितीने सकारात्मक अहवाल सादर केला आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढण्याच्यादृष्टीने शासनाकडून लवकरच अध्यादेश जारी होण्याची अपेक्षा आहे. एका पाहणीनुसार या धरणात सध्या १४ टीएमसी एवढा गाळ साचला असून तो काढल्यास तेवढ्याच प्रमाणावर धरणात पाणीसाठवण क्षमता वाढणार आहे.

मागील वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उजनीसह जायकवाडी (छत्रपती संभाजीनगर), गोसी खुर्द (भंडारा), गिरणा (नाशिक) आणि मुळा (अहमदनगर) आदी पाच धरणांतील साचलेला गाळ काढण्याची घोषणा केली होती. त्यासाठी मानके तयार करण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीमार्फत मागविण्याचे ठरले होते. त्यानुसार समिती गठीत झाली होती. परंतु तांत्रिक कारणांमुळे या समितीला संपूर्ण अहवाल सादर करता आला नव्हता. त्यामुळे पुन्हा नव्याने दुसरी समिती गठीत झाली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच शासनाला सादर केला आहे. उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी ही माहिती दिली.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

हेही वाचा : गोव्यातील कंपनीकडून अक्कलकोटच्या ठेवीदारांना गंडा

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान मानले गेलेल्या आणि शेतीकारण, अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचे केंद्रबिंदू मानल्या जाणा-या महाकाय उजनी धरणी धरणाची उभारणी १९८०-८१ साली पूर्ण झाली होती. त्यानंतर ४३ वर्षांत धरणात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ प्रथमच काढण्यात येणार आहे. त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. धरणात गाळमिश्रीत वाळू आहे. सुपीक शेतीसाठी गाळ शेतक-यांना उपलब्ध करून देता येईल. तर वाळू काढून त्याची विक्री केल्यास मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकणार आहे. गाळ काढण्यासाठी होणा-या खर्चापेक्षा जास्त महसूल वाळू विक्रीतून होईल, अशी अपेक्षा आहे.

यासंदर्भात शासनाने गठीत केलेल्या समितीने अंतिम अहवाल सादर केला आहे. धरणात गाळामध्ये ५० टक्के वाळू असून त्यानुसार वाळू, रेती आणि इतर घटक वेगळे करण्याचे नियोजन आहे. गाळ काढण्यासाठी किती मीटर खोल जायचे, गाळ काढताना जलाशयातील जीवसृष्टीला हानी न पोहोचण्यासाठी अकाॕस्टिकवाहिनीचा वापर करणे, जलाशयाचा परीघ किती, हे ठरवून त्याप्रमाणे गाळ काढण्यासाठी जलाशयात पोहोचण्याकरिता तात्पुरते रस्ते तयार करणेआदी बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे.

हेही वाचा : Pandharpur Darshan: विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता! श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू होणार

उजनी धरणात मागील वर्षी पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जेमतेम ६०.६६ टक्के पाणीसाठा झाला होता. परंतु नंतर चुकीच्या पाणी वाटप नियोजनामुळे धरणातील पाणीसाठा लवकर खालावला. गेल्या जानेवारीमध्ये हिवाळ्यातच धरणातील पाणीसाठा वजा पातळीवर गेला असून सध्या पाणीसाठा वजा ५३ टक्के एवढा खालावला आहे. त्याचा विचार करता धरणातील गाळ काढण्याची संधी आहे.