सोलापूर : सोलापुरात भरलेल्या महिलांच्या जागतिक मानांकन लाॅन टेनिस स्पर्धेत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने एकेरीत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत भारतासह १४ देशांतून ५६ महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या. सोलापूर जिल्हा लाॅन टेनिस संघटना व राज्य लाॅन टेनिस संघटनेच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुलात आठ दिवस चाललेल्या या खुल्या मानांकन लाॅन, ओॲसिस, इलिझियम व जामश्रीने पुरस्कृत केल्या होत्या. या स्पर्धेत एकेरीतअंतिम फेरीत भारताच्या सातव्या मानांकित सहजा यमलापल्ली हिने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवा हिचा ६-४, ६-३ असा पराभव केला. हा सामना एक तास २४ मिनिटे चालला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सातारा : महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटक अडकले वाहनांच्या गर्दीत

पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला. चौथ्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे ४-४ अशी बरोबरी झाली. सहजाने दहाव्या गेममध्ये एकतेरिनाची सर्व्हिस रोखली व हा ६-४ असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये सहजाने आक्रमक खेळ केला. चौथ्या गेममध्ये एकतेरिनाची सर्व्हिस रोखून ५-२ अशी आघाडी घेतली. एकतेरिनानेही सहजाची सातव्या गेम मध्ये सर्व्हिस रोखली. पण पुढे सहजाने एकतेरिना ची सर्व्हिस भेदली आणि ६-३ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्या सहजा यमलापल्लीला प्रिसिजन करंडक व तीन लाख २९ हजार ६०५ रूपये तर उपविजेत्या एकतेरिना मकारोवा हिला करंडक व एक लाख २९ हजार ८८१ रूपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे यतीन शहा, ओएसीस मॉलचे डॉ. शंतनू गांधी व सिद्धार्थ गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी २५ हजार डाॅलरची बक्षिसे ठेवण्यात आली होती.