सोलापूर : सोलापूरजवळील औद्योगिक वसाहतींमध्ये तयार होणाऱ्या मेफेड्रोन या अंमली पदार्थांमुळे आणि गेल्या काही दिवसांत चार-पाचवेळा झालेल्या पोलिसांच्या छापेमारीमुळे सोलापूरचे नाव चर्चेत आले आहे. मेफेड्रोन निर्मिती आणि विक्रीच्या अनुषंगाने मुंबई व नाशिकशी सोलापूरचे नाव जोडले गेले आहे. यात स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे.

१५ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळील चिंचोळी एमआयडीसीत एका बंद रसायन कारखान्यावर धाड घालून १६ कोटी रूपये किंमतीचे आठ किलो मेफेड्रोन आणि सुमारे १०० कोटी रूपयांचा कच्चामाल जप्त केला होता. याप्रकरणी राहुल किसन गवळी आणि अतुल किसन गवळी (रा. बाळे, सोलापूर) यांना अटक केली होती. त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनीही मोहोळजवळ देवडी येथे दोघाजणांकडून सुमारे सहा कोटी रूपये किंमतीचे तीन किलो मेफेड्रोन जप्त केले होते.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा : माळेगाव कारखान्याच्या बाहेर मराठा आंदोलक आक्रमक, अजित पवारांनी गळीत हंगामाच्या शुभारंभाला जाणं टाळल्याची माहिती

दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके (रा. औंढी, ता. मोहोळ) या दोघांना अटक केल्यानंतर तपासात मोहोळ येथील चंद्रमोळी सहकारी औद्योगिक वसाहतीत एस. एस. केमिकल नावाच्या बंद कारखान्यावर छापा घालून मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारा ३०० किलो कच्चा माल आणि एक हजार किलो रसायन सापडले होते. त्याची किंमत अद्यापि कळली नाही. यात चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत तयार होणारे मेफेड्रोन आणि त्यांची विक्री व्यवस्था एकमेकांशी निगडीत असल्याचे तपासात दिसून आले होते.

हेही वाचा : यवतमाळ : उमरखेडमध्ये अज्ञात तरुणांनी एसटी बस जाळली; मराठा आंदोलनाशी संबंध की वेगळे कारण? तपास सुरू…

याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच नाशिक पोलिसांनी चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत धाड टाकून एका बंद कारखान्यातून सुमारे दीड कोटी रूपये किंमतीचे मेफेड्रोन हस्तगत केले. नाशिकच्या ड्रग्ज माफियांकडील तपासातून त्याचे धागेदोरे सोलापूरपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईच्या पाठोपाठ सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जसंदर्भात चिंचोळी एमआयडीसीत आणखी एक कारवाई केली. उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातून अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे सुमारे दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. छोटू उर्फ चंद्रभानसिंह मोहनलाल कौल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे चिंचोळी एमआयडीसीमधील एका बंद पडलेल्या कंपनीतून ६३९ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज तर अन्य एक ६६२ ग्रॅम संशयास्पद अंमली पदार्थ पोलिसांनी केले जप्त केले.

हेही वाचा : “मी सरकारला शेवटचं सांगतो…”, मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा

६३९ ग्रॅम मेफेड्रोनची किंमत साधारण एक कोटी २७ लाख रूपये इतकी आहे. तर दुसऱ्या अमली पदार्थाची ओळख अद्याप पटलेली नाही. १७ ऑक्टोबर रोजी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ड्रग्ज संदर्भात कारवाई करीत तीन मेफेड्रोनसह दोघा आरोपींना अटक केली होती. या दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारेच छोटू उर्फ चंद्रभानसिंह मोहनलाल कौल याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपी चंद्रभानसिंह याला ३० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.