सोलापूर : एका वयोवृद्ध शिक्षकाशी असलेल्या ओळखीतून विद्यार्थ्याने आर्थिक गुंतवणुकीच्या नावाखाली आकर्षक परताव्याची भुरळ पाडून त्या वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकाची १२ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. याबाबत सलीम शमशोद्दीन वळसंगकर (वय ६८, रा. रमाकांत कर्णिकनगर, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचाच विद्यार्थी असलेला सोहेल हजरतखान पटेल (रा. कांदाबाजार, अक्कलकोट) याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. तो गायब झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

सलीम वळसंगकर हे पूर्वी पंढरपूर नगरपरिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवेत असताना त्याच शाळेत सोहेल पटेल हा विद्यार्थी म्हणून वळसंगकर यांच्याकडून अध्यापनाचे धडे घेत होता. तेव्हापासून त्याची वळसंगरकर यांच्याशी ओळख होती. दरम्यान, २१ ऑगस्ट २०२३ रोजी त्याने सोलापुरात वळसंगकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. आपण ॲमेझाॅन इंटरनॅशनल कंपनी आणि भारत पे नॅशनल कंपनीमध्ये गुंतवणूकदार म्हणून काम करीत असल्याचे सांगत कंपनीने दिलेले स्वतःचे ओळखपत्र दाखवून गुरूजींना गुंतवणुकीची योजना सांगितली.

अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Dhirubhai Ambani International School Fees
‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ची फी किती? आकडा ऐकून थक्क व्हाल! ऐश्वर्या रायची लेक, शाहरुखचा मुलगा आहे या शाळेचा विद्यार्थी
Transfer of Rs 1500 aid under Ladki Bahin scheme resumes in Maharashtra
Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा
households savings shift from bank fds to mutual funds and insurance in last 3 years
घरगुती बचतीचे वळण म्युच्युअल फंडांकडे, तरी ‘एफडीं’चा वरचष्मा कायम : स्टेट बँकेचा अहवाल
More than 25 lakh books sold at Pune Book Festival with turnover of 40 crores
पुणे पुस्तक महोत्सवात यंदा पुस्तक विक्रीत चौपटीने वाढ; किती झाली उलाढाल?

हेही वाचा : मल्लिकार्जुन खरगेंचा व्हिडीओ ट्विट करत बावनकुळेंचा राऊतांना खोचक सल्ला; म्हणाले, “यावरही भ्रष्टलेख लिहा”

अडीच लाखांची रक्कम कंपनीत गुंतवल्यास एका वर्षात तीन लाख ६५ हजारांची रक्कम बँक खात्यावर जमा होईल, असे म्हणून विश्वास संपादन करत सोहेल पटेल याने वळसंगकर गुरूजींना गुंतवणूक करण्यास राजी केले. वेळोवेळी मिळून वळसंगकर यांनी १२ लाख ५० हजार रूपयांची रक्कम गुंतवली. परंतु वर्ष उलटून गेले तरी परतावा मिळत नसल्यामुळे अडचणीत आलेल्या वृध्द वळसंगकर यांनी सोहेल पटेल याच्या पाठीमागे लकडा लावला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि शेवटी त्याने, मला रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. तुम्ही मला पैसे परत मागितले तर मी तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Story img Loader