सोलापूर : श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने अक्कलकोट भूमीसह संपूर्ण भारतातील अनेक प्रांत पावन झाले आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या नामाचा विस्तार संपूर्ण देशात आहे. आज श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास प्रत्यक्ष भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा योग आला. ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींचे दर्शन घेतल्यामुळे आपण अत्यंत प्रभावित झालो असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Parliament Session 2024 Updates : नव्या संसदीय अधिवेशनात सुप्रिया सुळेंना आठवली शरद पवारांची ‘ती’ वाक्ये, म्हणाल्या…

अक्कलकोट येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन भागवत यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या गाभारा मंडपात भागवत यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. भागवत यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या अध्यात्मिक कार्याची दखल घ्यावी असेच कार्य आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन आम्ही वाराणसीत जुलै २०२३ मध्ये संपन्न झालेल्या टेम्पल कनेक्टिव्हिटी समारंभास त्यांना आम्ही विशेष आमंत्रित केल्याचा भागवत यां असल्याच्या आठवणींनाही भागवत यांनी आवर्जून उल्लेख केला. याप्रसंगी प्रथमेश इंगळे यांच्यासह उपस्थितीसह मंदिराचे पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार पुजारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक प्रशांत पांडकर, तालुका प्रचारक यश कुलकर्णी, तालुका कार्यवाह चेतन जाधव, तालुका संघचालक रवी जोशी, संतोष वगाले, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : आदित्य ठाकरेंच्या टीकेवर राज ठाकरेंना माध्यम प्रतिनिधींचा प्रश्न; ‘सुपारीबाज पक्ष’ म्हटल्याबाबत विचारताच म्हणाले…

इंगळे कुटुंबीयांचे सांत्वन

महेश इंगळे यांच्या पत्नी रूपाली इंगळे यांने नुकतेच निधन झाले. त्याबद्दल भागवत यांनी इंगळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. श्री.स्वामी समर्थ महाराज महेश इंगळे यांना लवकरात लवकर या दुःखातून सावरण्याचे बळ द्यावे अशी स्वामीचरणी प्रार्थना त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur rss chief mohan bhagwat visit sri swami samarth temple css