सोलापूर : काशीच्या जंगमवाडी वीरशैव मठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुक्त कंठाने प्रशंसा करीत सोलापूरचा विकास केवळ शिंदे हेच करू शकतात, असा विश्वास व्यक्त करीत, त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे भविष्यात लोकसभेत पाहायला आपणांस नक्कीच आवडेल, अशा शब्दात जगदूगुरूंनी शुभेच्छाही दिल्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

सोलापूरच्या होटगी वीरशैव मठात जडणघडण झालेले डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी गेल्या दोन वर्षांपासून काशीच्या जंगमवाडी मठाच्या जगद्गुरूपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर राखीव मतदारसंघातून उभे राहण्यासाठी भाजपसह संघ परिवाराकडून डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींना आग्रह झाला होता. परंतु त्यांनी त्यास नकार दिला असता भाजपचे गौडगाव मठाचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना भाजपने उमेदवारी देऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या दोघा दिग्गजांना पराभूत केले होते.

News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
13 yr old sadhvi in mahakumbh
महाकुंभ मेळ्यामध्ये साध्वी होणार IAS अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी मुलगी; चर्चेत असलेली राखी सिंह कोण आहे?

हेही वाचा : “तुझं खातो का रे?”; मनोज जरांगेंवर टीका करताना छगन भुजबळांची जीभ घसरली, म्हणाले…

या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सोलापूरजवळ कुंभारी येथे आप्पासाहेब बिराजदार यांनी आयोजिलेल्या कार्यक्रमात काशी जगदूगुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी व सुशीलकुमार शिंदे दोघेही एकत्र आले. यावेळी जगद्गुरूंनी सुशीलकुमार शिंदे यांची मुक्त प्रशंसा करीत, सोलापूरचा सर्वांगीण विकास केवळ शिंदे हेच करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. इरेश स्वामी यांच्या रूपाने पहिल्यांदाच लिंगायत समाजाला संधी देणारे सुशीलकुमार शिंदे हेच बोरामणीचे आंतरराष्ट्रीय काॕर्गो विमानतळ पूर्ण करू शकतात. हे विमानतळ उभारणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे सोलापूरसह शेजारच्या धाराशिव, लातूर आणि कर्नाटकातील गुलबर्गा आणि विजापूरच्या विकासाला चालना मिळू शकेल. हे विमानतळ होण्यासाठी सुशीलकुमारांनीच प्रयत्न केले आणि तेच हे विमानतळ पूर्ण करू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एवढेच नव्हे तर त्यांनी सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रबळ दावेदार असलेल्या सुशीलकुमारांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचेही तोंड भरून कौतुक केले. प्रणिती शिंदे भविष्यात लोकसभेत पाहायला मला आवडेल, या शब्दांत त्यांनी आशीर्वाद दिले.

हेही वाचा : “पंढरपूरचा राजा यादव कुळातल्या कृष्णाचा अवतार, म्हणजे ओबीसी, देवाला जात…”; छगन भुजबळांचं जरांगे पाटलांना जोरदार उत्तर

हेही वाचा : “तेव्हा लाज वाटली नाही का? तुम्ही महिला पोलिसांना…”, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंसह आंदोलकांवर गंभीर आरोप

या कार्यक्रमास हजारो वीरशैव जनसमुदायासह व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.

Story img Loader