सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची सभा करमाळा तालुक्यातील दिवे गव्हाण येथे झाली. परंतु, या सभेला अपेक्षित जनसमुदाय हजर नव्हता. त्यामुळे जरांगे यांचा पूर्वीचा प्रभाव आता ओसरू लागल्याचे मानले जात आहे. दिवे गव्हाण येथील जरांगे-पाटील यांची सभा पूर्वनियोजित होती. त्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची अपेक्षा गृहीत धरून १९ एकर क्षेत्राएवढ्या मैदानावर नियोजन केले जात होते. परंतु, भर दुपारी रणरणत्या उन्हात ठरलेल्या सभेसाठी अपेक्षित गर्दी होणार नाही, याचा विचार करून पाच एकर मैदानावर सभेची तयारी झाली. तरीही अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, पारनेरमार्गे जरांगे यांना करमाळ्यात सभास्थानी पोहोचायला सुमारे दोन तासांचा विलंब झाला. प्रत्यक्ष सभेला हजाराचाही जनसमुदाय उपस्थित नसल्याचे पाहून जरांगे यांचा मूड गेला. त्याबद्दल त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली नसली तरी ३५ किलोमीटर अंतरावरील सभास्थानी येताना रस्ता अतिशय खराब असल्यामुळे खूप त्रास झाला. ज्या मोटारचालकाने आपणांस या खराब रस्त्याने तुडवत आणले, त्याला माझ्यासमोर आणा अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मनोज जरांगेंचा प्रभाव ओसरू लागला ? करमाळ्यात सभेला अल्प प्रतिसाद; भाषणही पाच मिनिटांत आटोपले
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची सभा करमाळा तालुक्यातील दिवे गव्हाण येथे झाली. परंतु, या सभेला अपेक्षित जनसमुदाय हजर नव्हता.
Written by लोकसत्ता टीम
सोलापूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-03-2024 at 15:41 IST
TOPICSमनोज जरांगे पाटीलManoj Jarange PatilमराठाMarathaमराठा आरक्षणMaratha Reservationमराठा समाजMaratha Communityमराठी बातम्याMarathi News
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur s karmala very few people attended rally of manoj jarange patil css