सोलापूर : लग्नाळू तरूणांना लग्न लावून देण्याची भुरळ पाडून लुटण्याच्या घटना वाढत आहेत. त्यासाठी पैशाचे आमीष दाखवून आर्थिकदृष्ट्या गरीब घरातील तरूणींचा वापर करून त्यांचीही फसवणूक केली जाते. असाच प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. पीडित तरूणीच्या फिर्यादीनुसार एका महिलेविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील न्यू पाच्छा पेठेत गेंट्याल चित्रपटगृहाजवळ हा फसवणुकीचा प्रकार घडला असून याप्रकरणी त्याच परिसरात राहणा-या संगीता बिराजदार हिच्या विरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील ३२ वर्षांची पीडित तरूणीच्या घराशेजारी राहणा-या रेखा बिराजदार हिच्या ओळखीची असलेली संगीता बिराजदार हिने पीडित तरूणीच्या असाह्यतेचा फायदा घेऊन तिला मदत देऊ करण्याचा बहाणा केला. गेल्या २० जून रोजी रात्री गेंट्याल चौकात संगीता बिराजदार हिने पीडित तरूणीला भेटून, तुला काम देते, त्याबद्दल ५० हजार रूपये देते. पण मी जे काम सांगेन, ते करावे लागेल, अशी अट घातली. ५० हजार रूपयांच्या आमिषामुळे पीडित तरूणीने होकार दिला.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bengaluru techie's wife files dowry harassment complaint, claims she was treated like a Animal.
Atul Subhash : “मला जनावरासारखे वागवले…”, काय आहेत अतुल सुभाष यांच्यावर पत्नी निकिताचे आरोप?
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
online fraud of Rs 57 lakhs with senior citizen women on pretext of extra returns
जादा परताव्याच्या अमिषाने वृद्धेची ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ५७ लाखांची फसवणूक
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे

हेही वाचा : “अजित पवारांचा धाक कमी झाला, आता सूचना दिल्या तरी…”, नाना पटोलेंचा खोचक टोला

त्यानंतर संगीता बिराजदार हिने रेखा बिराजदार हिच्यासह पीडित तरूणीला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात नेले. तेथे प्रवीण वाणी नावाच्या लग्नाळू तरूणाबरोबर खोटे लग्न करायचे आहे. त्याबद्दल ५० हजार रूपये देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार खोटे लग्न झाले. परंतु हा फसवणुकीचा प्रकार पीडित तरूणीला मान्य नव्हता. तिने विरोध करताच संगीता बिराजदार हिने तिला खोट्या लग्नातील छायाचित्रे व चित्रफिती समाज माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी दिली. तिने प्रवीण वाणी याच्या भावाकडून लग्नाबद्दल अडीच लाख रूपये उकळले. यात फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Story img Loader