सावंतवाडी: मुंबईतील गिरणी बंद होवून जवळपास ४२ वर्ष उलटून गेली. सरकारने घरं देणार म्हणून घोषणा, निर्णय घेतला आहे. मात्र कामगारांना घरे बांधून देण्याबाबत सरकार टोलवाटोलवी करत असल्याने हयातीत घरे मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सरकारने घरा ऐवजी प्रत्येक कामगाराला ८० लाख रुपये द्यावे आणि ज्यांना घरं पाहिजे त्यांना घरे बांधून द्यावीत अशी अपेक्षा सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघटनेच्या बैठकीत कामगारांनी व्यक्त केली.सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघटनेची बैठक काझी शहाबुद्दीन हाॅल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष शामसुंदर कुंभार, खजिनदार लाॅरेन्स डिसोझा, रामचंद्र कोठावळे, सुभाष परब, विश्वनाथ कुबल,अभिमन्यू लोंढे, सुमन मुळीक, घनश्याम शेटकर आदी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in