कल्पेश भोईर
मीठ उत्पादकांच्या संकटात चक्रीवादळाची भर
वसई: मागील काही वर्षांंपासून विविध प्रकारच्या संकटामुळे मीठ उत्पादन क्षेत्र अडचणीत सापडू लागले आहे. त्यातच आता तौक्ते वादळामुळे झालेल्या पावसात मिठागरांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार करून ठेवलेल्या मिठाच्या राशी व मिठाची योग्य डिग्री तयार होण्यासाठी ठेवलेले मीठ पाण्यात विरघळले.
वसई-विरारच्या भागात मोठय़ा प्रमाणात पारंपरिक मीठ व्यवसाय केला जात आहे. वसईतील जुचंद्र, नायगाव, उमेळे, उमेळमान, राजावली, नवघर पूर्व परिसर , पाणजू, यासह इतर ठिकाणी मीठ पिकविले जाते.
परंतु अवकाळी पाऊस , करोनाचे संकट यामुळे पारंपरिक मीठ व्यवसाय संकटात सापडू लागला आहे. मागील वर्षीचा मीठ उत्पादनाचा हंगाम नुकसानीचा ठरला होता. त्यावेळी केवळ वसईतील मीठ उत्पादन क्षेत्रात केवळ ३० ते ४० टक्केच इतकेच उत्पादन निघाले होते. तर या वर्षी अवकाळीमुळे उशिराने मीठ उत्पादन करण्यास सुरवात झाली होती.
तरी सुद्धा मीठ उत्पादकांनी मजूर लावून चोपणे, पाणी जमा करणे, पाण्याची योग्य डिग्री तयार करणे, तयार झालेल्या मीठ गोळा करून त्याच्या राशी करणे अशी विविध प्रकारची कामे जोमाने सुरू झाली होती. मात्र रविवारी रात्रीपासूनच तौक्ते वादळाने शहरात थैमान घातले आहे. यामुळे झालेल्या मुसळधार पावसाने तयार झालेला मिठाचा माल भिजून लाखोंचे नुकसान झाले असल्याचे मीठ व्यावसायिकांनी सांगितले आहे.
फेब्रुवारी ते मेअखेपर्यंतचा मीठ उचलण्यासाठीचा महत्त्वाचा हंगाम असतो. यावेळी तयार झालेले मीठ व्यापारी येऊन घेऊन जातात. तर जे काही मीठ शिल्लक राहील त्यांच्या राशी करून ते गवताने बंदिस्त करून सुरक्षित ठेवतो. मात्र ही सर्व कामे पूर्ण होण्याआधीच आलेल्या पावसाने मिठाचे नुकसान केले आहे. मीठ तर पाण्यात गेलेच परंतु इतर साहित्याची सुद्धा वादळीवाऱ्यामुळे नासधूस झाली आहे. यावेळी झालेले मीठ उत्पादकांचे नुकसान हे मोठे आहे. हातातोंडाशी आलेला घास या वादळीपावसाने हिरावून घेतल्याने मीठ उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. या मीठ उत्पादकांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून त्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
खर्च वाया
करोनाच्या संकटामुळे आधीच मिठागरात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी कामासाठी दोन पैसे अधिकचे मोजून मजूर आणले होते. तर काहींना आगाऊ रक्कम देऊन त्यांच्याकडून काम करवून घेतले होते. मात्र चांगला तयार झालेला मिठाचा माल पूर्णत: पाण्यात वाहून गेल्याने मजूर खर्च व इतर खर्च वाया गेला आहे.
कोट
वादळीपावसाने तर मिठाचे फारच नुकसान केले आहे. माझ्या मिठागरातील जवळपास १५ ट्रक इतका माल भिजून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे सुटलेल्या वादळीवाऱ्यात इतर साहित्यही वाहून गेले आहे.
— नरहरी पाटील, मीठ उत्पादक जूचंद्र
शिल्लक मिठाच्या राशींची बंदिस्ती
तौक्ते वादळीवाऱ्याच्या पाण्यात मिठाच्या तयार केलेल्या राशी या वाहून गेल्या आहेत. बुधवारी पावसाने उसंत घेतल्याने जे काही उरले सुरले मीठ शिल्लक आहे. त्याची आवरा आवर करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सर्व मीठ एकत्र करून ते सुरक्षित राहावे यासाठी त्यावर गवत टाकून बंदिस्त करण्याची लगबग मिठागरात सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे.
आलेल्या पावसाने मिठाचे नुकसान केले आहे. मीठ तर पाण्यात गेलेच परंतु इतर साहित्याची सुद्धा वादळीवाऱ्यामुळे नासधूस झाली आहे. यावेळी झालेले मीठ उत्पादकांचे नुकसान हे मोठे आहे. हातातोंडाशी आलेला घास या वादळीपावसाने हिरावून घेतल्याने मीठ उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. या मीठ उत्पादकांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून त्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
खर्च वाया
करोनाच्या संकटामुळे आधीच मिठागरात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी कामासाठी दोन पैसे अधिकचे मोजून मजूर आणले होते. तर काहींना आगाऊ रक्कम देऊन त्यांच्याकडून काम करवून घेतले होते. मात्र चांगला तयार झालेला मिठाचा माल पूर्णत: पाण्यात वाहून गेल्याने मजूर खर्च व इतर खर्च वाया गेला आहे.
वादळीपावसाने तर मिठाचे फारच नुकसान केले आहे. माझ्या मिठागरातील जवळपास १५ ट्रक इतका माल भिजून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे सुटलेल्या वादळीवाऱ्यात इतर साहित्यही वाहून गेले आहे.
— नरहरी पाटील,
मीठ उत्पादक जूचंद्र