राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,७७,९५४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२७ टक्के एवढे झाले आहे.

आज राज्यात २,६९६ नवीन रुग्णांचे निदान झाले.आता राज्यातील करोना बाधितांची एकूण संख्या ६५,५६,६५७ झाली आहे. आज दिवसभरात ४९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९१९६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९०,७४,६६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,५६,६५७ (११.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४७,००६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,३७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज रोजी एकूण ३५,९५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,५६,६५७ झाली आहे.

Story img Loader