आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.तर या पहिल्या यादीत पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना आणि पर्वती विधानसभा मतदारसंघांमधून माधुरी मिसाळ या तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
या तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि उमेदवार चंद्रकांत पाटील म्हणाले की,पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खूप आनंदी असून आता आणखी जबाबदारी वाढली आहे.येत्या काळात आणखी विकास काम केली जाणार आहे.तसेच लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून ७४ हजारांच मताधिक्य मिळाली आहेत.यामुळे प्रचंड मतांनी निवडून येणार आणि पुन्हा एकदा महायुतीच सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पर्वती विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार आणि उमेदवार माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पर्वती विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा संधी दिली आहे.त्याबद्दल सर्व वरीष्ठ नेत्यांचे आभार मानते.या मतदार संघातून अनेक जण इच्छुक होते.यातून लोकशाही जिवंत असण्याची लक्षण आहेत.त्यामुळे इच्छुकांनी मागणी करण,यामध्ये काही गैर नसून अखेर पक्षांने निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…‘एसटी’च्या भाडेवाढ रद्दमुळे १०० कोटींचा फटका, अन् कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट…
यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की,मागील पाच वर्षाच्या कालावधीत शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मोठया प्रमाणावर काम केली आहेत.त्या कामाची दखल भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी दखल घेऊन पुन्हा उमेदवारी दिली आहे आणि प्रचंड मतांनी निवडून येणार आहे.तसेच यंदा देखील महायुतीच सरकार येणारा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.