वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती गरजेची आहे. पण जर वेगळा विदर्भ होणार नसेल, तर गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करावेत, अशी मागणी आमदार धर्मरावबाबा अत्राम यांनी मंगळवारी केली. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करावेत, अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पाठवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, वेगळा विदर्भ होणे हे गरजेचे आहे. वेगळे विदर्भ राज्य हे छत्तीसगढ किंवा उत्तराखंडपेक्षा सक्षम होईल. मात्र, वेगळा विदर्भ होणार नसेल, तर गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करावेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सहा ते सात तालुक्यांमध्ये तेलगू भाषा बोलली जाते. चंद्रपूर जिल्ह्यामध्येही अनेक लोक तेलगू बोलतात. त्यामुळे भाषेचा काही प्रश्न निर्माण होणार नाही. मुंबईतून आमचा विकास होईल, अशी आशा आता संपलीये, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader