लांडगा प्राण्याच्या संवधर्नसाठी आटपाडी तालुययातील डुबई कुराणाचा संरक्षित वन्य क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली असून आटपाडीतील स्वतंत्रपूर वसाहतीनजीक 9.48 चौरस किलोमीटरचे हे कुरण आहे .माणदेशातील वन संपदा प्रतिकूल परिस्थितीमध्येही टिकून आहे. आता सिंचन योजनांचे पाणी आल्यामुळे यामध्ये वाढ होण्याची शययता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा परिसर तृणभक्षी प्राण्यांवर गुजराण करणार्‍या लांडग्यांसाठी प्रसिध्द आहे. या वन्य प्राण्याचे संवर्धन व्हावे यासाठी डुबई कुरणाचा राखीव क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. याबाबत सांगली वन विभागाच्यावतीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यासाटी मादन वन्यजीव रक्षक अजित उर्फ पापा पाटील, अजितकुमार पाटील, प्रा. विभुते आदींसह अपर प्रधान मुख्य  वनसंरक्षक डॉ. व्ही.  क्लेमेंट आदींनी पाठपुरावा केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inclusion dubai area in atpadi sangli protected forest area for wolf tmb 01