मोहर येण्याच्या सुरुवातीला पडलेला पाऊस, त्यानंतर फलधारण होताना वाढलेले तापमान यामुळे यंदा रायगड जिल्ह्य़ात आंब्याचे उत्पादन घटले आहे. त्याचबरोबर पक्वतादेखील उशिराझाल्यामुळे आंबा उशिरा बाजारात येईल. त्यामुळे आंबा बागायतदारांचे उत्पन्नदेखील कमी होणार आहे.
रायगड जिल्ह्य़ात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पीक घेतले जाते. डिसेंबपर्यंत पाऊस पडला. थंडी उशिरा सुरू झाली. त्यामुळे मोहर उशिरा आला. मोहर येण्याच्या सुरुवातीला पाऊस पडल्यामुळे मोहर गळाला. त्यानंतर फलधारणा होताना अचानक तापमानात वाढ झाली. त्यामुळे फळगळती झाली. वारंवार तापमानात बदल झाल्यामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. यंदा रायगड जिल्ह्य़ात आंब्याचे उत्पादन घटले आहे. रायगडातील आंबा बाजारात येण्यापूर्वी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ातील आंबा बाजारात आला आहे. रायगडात मोहर उशिरा आल्यामुळे पक्वता उशिरा आली. त्यामुळे रायगडातील आंबा बाजारात उशिरा येणार आहे. आंबा उशिरा आल्यामुळे बाजारात आंब्याला भाव मिळणार नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांचे उत्पन्नदेखील घटणार आहे.
पुढच्या वर्षी काळजी घ्या!
आंबा व्यापारी आणि बागायतदार शेतकरी यांच्याकडून आंबा पिकावर होणारी अमर्याद औषधे व कीटकनाशक फवारणी यामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसणार आहे. यावर्षी युरोपियन देशांनी भारतीय आंब्यावर बंदी घातली होती. ही बंदी उठविण्यात सरकारला यश आले असले तरी भारतीय आंबा फळ युरोपियन देशाच्या चाचणीमध्ये पास झाला नाही, तर पुढील वर्षी भारतीय आंबा युरोपियन बाजारपेठेत जाऊ शकणार नाही. याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना काळजी घ्यावी लागणार आहे.
एखाद्या रसायनाने कीड मरते म्हणूनही काही व्यापारी अशा रसायनांचा वापर करतात. मात्र या औषध आणि कीटकनाशकांचा अंश फळांमध्ये उतरतो. यापूर्वी युरोपात गेलेला भारतीय आंबा फळामध्ये कीटकनाशक व औषधांचा अंश आढळून आला. त्यामुळे भारतीय आंबा शुद्धतेच्या पात्रतेला उतरला नाही.
परिणामी या देशांनी अचानक भारतीय आंबा मालावर बंदी घातली. अचानक आलेल्या बंदीमुळे आंबा निर्यातदार आणि शेतकरी अडचणीत आला. सरकारने यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न केले.
आंबा पीक बाजारात दाखल होत असताना अचानक घातलेली बंदी उठवावी यासाठी भारत सरकारने युरोपीयन देशांशी चर्चा केली. यात सरकारला यश आले. या देशांनी भारतीय आंब्याला ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे भारतीय आंबा युरोपीयन देशात पोहोचणे शक्य झाले. मात्र पुढील वर्षी आंबा पीक घेताना व्यापारी आणि शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी युरोपीयन देशाने आंबा फळासाठी प्रमाणित केलेले अथवा त्यांच्या तपासणीवर उतरणारी औषधे-कीटकनाशके वापरावी लागणार आहेत. अन्यथा पुढील वर्षी हापूससह भारतीय आंबा सातासमुद्रापलीकडे जाऊ शकणार नाही. याचा मोठा फटका कोकणातील हापूस आंब्याला बसणार आहे.
त्यामुळे बागायतदारांचे होणारे आíथक नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागामार्फत येत्या जुल महिन्यापासून आंबा पिकावरील खत-कीटकनाशक वापराबाबत नियोजन व बागायतदारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा