कंपनी घोटाळाप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस प्राप्तिकर विभागाने  बजावली आहे. कंपनी घोटाळ्यासंबंधी सुरु असलेल्या चौकशी दरम्यान प्राप्तिकर विभागाकडे असलेल्या कागदपत्रांबाबत शहानिशा करण्यासाठी गडकरींनी स्वत उपस्थित राहण्याबाबत नोटीस पाठवण्यात आल्याचे प्राप्तिकर सूत्रांनी सांगितले.  गडकरींना याआधी चौकशीसाठी हजर राहता आले नव्हते. मात्र आता २१ जानेवारी रोजी त्यांना हजर रहावे लागणार आहे. गडकरींच्या पूर्ती कंपनीत गुंतवणूक केल्याबद्दल अनेक कंपन्याची प्राप्तिकर विभागाने चौकशी सुरु केली आहे. सुमारे ३० कंपन्यांनी पूर्तीमध्ये केलेल्या गुंतवणुकीबाबतची कागदपत्रे सापडली आहेत. दरम्यान, गडकरींना अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Story img Loader