जिल्ह्यात शहरांबरोबर ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १२० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजवरच्या एकुण बाधितांची संख्या २ हजार १५० वर पोहचली आहे. तर ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार २८८ जणांवर उपचार सुरू असून, ७९८ जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे.

मागील काही दिवसात उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर, कळंब शहरात असलेला रुग्णवाढीचा वेग आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरत चालल्याचे दिसत आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या ४१४ स्वॅबपैकी ३५१ अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. यातील तब्बल १२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. २२५ अहवाल निगेटिव्ह आले असून ६संदिग्ध आहेत. तर ६३ अद्याप प्रलंबित आहेत.

उस्मानाबाद शहर व तालुक्यात २७, उमरगा २८, तुळजापूर १३, कळंब १५, परंडा ३१, भूम १, वाशी ८ असे एकुण १२० रुग्ण आढळून आले आहेत. उस्मानाबाद शहरातील जुना बस डेपो येथे १, टीपीएस रोड येथे ५, शंकरनगर ३, शंकरनगर १, जिल्हा रुग्णालय १ तर संत ज्ञानेश्वर नगर येथे पुन्हा १ रुग्ण आढळला आहे. तर तालुक्यातील पाडोळी येथे ७ आणि तेर येथे ६ रुग्ण तसेच रुईभर, हिंगळजवाडी येथेही प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

तुळजापूर शहरातील कमानवेस येथे ४, विश्वासनगर २, जिजामाता नगर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कुंभार गल्ली येथे प्रत्येकी १ तर तालुक्यातील मसला येथे २ रुग्ण आढळले आहेत. उमरगा शहरातील बालाजीनगर, उपजिल्हा रुग्णालय, गौतमनगर, काळे प्लॉट, पतंगे रोडसह तालुक्यातील कोरेगाववाडी, तुरोरी, कोराळ, गुंजोटी येथे नवे रुग्ण आढळले आहेत. कळंब शहरातही सोनार गल्ली, खाटिक गल्ली तर तालुक्यातील चोराखळी, डिकसळ, येरमाळा, रत्नापूर, वडगाव निपाणी येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. परंडा तालुक्यातील शेलगाव येथे ११ रुग्ण नव्याने आढळले असून शहरातील सोमवार गल्ली, शेवाळे वस्ती, नालसाब गल्ली, खंडोबा चौक, राजापूर गल्ली, मंडई पेठ, समतानगर, मंगळवारपेठ, खुर्द गल्ली ताजुक्यातील पाचपिंपळा येथे नवे रुग्ण आढळले आहेत. वाशी येथील एसबीआय बँकेत ३ तर बस स्थानक भागात ५ रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील ६६ वर्षीय वृद्धाचा सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजवरच्या मृतांची संख्या ६४  झाली आहे.

Story img Loader