“आमचे ४० आमदार परत गेले तरी राज्य सराकारला धोका नाही. भाजपा आणि अपक्ष आमदार मिळून सरकार बनवू शकतात, असं धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी कुणाचीही भीती नाही. मंत्रिमंडळ विस्तार हा अंतर्गत प्रश्न आहे.” असं म्हणत बच्चू कडू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना टोला लगावला आहे. सरकार कोसळण्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला” असल्याची टीका पटोलेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पटोलेंनी आपले शब्द मागे घ्यावेत

दोनच मंत्र्यांचे असलेले शिंदे -फडणवीस सरकार अपंग असल्याची टीका पटोले यांनी केली होती. दिव्यांगाना कमजोर समजणे हा पटोले यांचा नासमजपणा आहे. ते लोक तुमच्यापेक्षाही सक्षम असल्याचा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे. नानांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा- ‘शिंदे सरकार लवकरच पडणार’ या राऊतांच्या दाव्यावरुन प्रश्न विचारला असताना शरद पवार म्हणाले, “संजय राऊतांवर मी…”

आधी शेतकरी मग सरकार

राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन मंत्री आहेत. मात्र, ते राज्याचा कारभार सांभाळण्यास सक्षम आहे. काही अडचणींमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला गेला. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे काहीही नुकसान झालेले नाही. राज्यसरकारने शेतकऱ्यांसाठी विविध सवलतीच्या घोषणा केल्या आहेत. जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही पहिला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू आणि मग सरकारच्या, अशी ग्वाही बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना दिली आहे.

हेही वाचा- सत्ताबदलावर अजित पवार यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “माझा मुहूर्तावर…”

राज्यात नियमानुसार ओला दुष्काळ

राज्यात नियमानुसारच ओला दुष्काळ जाहीर करण्यात येतो. विरोधी पक्षनेते अजित पवारांना याबाबत कल्पना असल्याचे म्हणत बच्चू कडूंनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अजित पवारांनी केली होती. सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली असल्यामुळे आंदोलन करण्याची गरज नाही. जर सरकारने मदत दिली नाही तर आम्ही सुद्धा सरकारविरोधात आंदोलन करु असेही बच्चू कडू म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent mla bachchu kadu on maharashtra cabinet expansion dpj