पर्वतारोहणसारखे साहसी खेळ शिकवणारी स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट आता महाराष्ट्रातही सुरू होणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात सरकारकडे मागणी केली होती. सरकारने या इन्स्टिट्यूटसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

“लवकरच स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट होणार, आपल्या मागणीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद!”, असं ट्वीट खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Amol Kolhe On Ajit Pawar
Amol Kolhe : “चुकीला माफी मिळते, पण गद्दारीला…”, खासदार अमोल कोल्हेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

ते म्हणाले की, “नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरींग धर्तीवर महाराष्ट्रात गिर्यारोहक इन्स्टिट्यूटची निर्मिती व्हावी अशी मागणी आपण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदयांकडे केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकिल्ले तमाम शिव-शंभू भक्तांसाठी शक्तीस्थळे आहेत. अनेकजण या गडकिल्ल्यांवर प्रेरणा घेण्यासाठी जात असतात. त्यासह अनेकांना गिर्यारोहणाची आवड आहे, कदाचित ती या महाराष्ट्राच्या मातीच्या रक्तातच असावी. या अनुषंगाने सर्व गिर्यारोहकांच्या दृष्टीने हे इन्स्टिट्यूट होणे आवश्यक असल्याने यासंदर्भात मी मागणी केली होती. मला सांगायला आनंद होतोय की आपल्या या मागणीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांतर्फे मी त्यांचे जाहीर आभार मानतो!”

हेही वाचा>> विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे जाणार? अमोल मिटकरी म्हणाले, “भाजपाची कोंडी करायची असेल तर…”

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रावादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ७ डिसेंबर २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या इन्स्टिट्यूटच्या मागणीसाठी पत्र लिहिले होते. “भारतात आज गिर्यारोहण प्रशिक्षण देणाऱ्या चार संस्था कार्यरत आहेत. नेहरू इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियरिंग (उत्तरकाशी), दार्जिलिंग येथील पर्वतारोहण संस्था, मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी माऊंटेनियरिंग अॅण्ड अलाईड स्पोर्ट्स संस्था आणि पगलगाम येथील जवाहर इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियरिंग या संस्थांचा समावेश आहे. या चारही संस्थांमधून बेसिक पर्वतारोहण कोर्स, अॅडवान्स पर्वतारोहण कोर्स आणि शोध आणि बचाव, मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन असा अभ्यासक्रम शिकवला जातो. पुणे विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर राज्यात गिर्यारोहण इन्स्टिट्यूट निर्माण करण्याबाबत प्राधान्याने विचार करावा”, अशी मागणी अमोल कोल्हेंनी पत्राद्वारे केली होती.

या पत्राला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. “स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्युटची निर्मिती करण्याबाबत आपण केलेल्या विनंतीबाबत, शालेय शिक्षणव क्रिडा विभागामार्फत आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ महाराष्ट्र अधिनियम २०२० अन्वये क्रिडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले असून या विद्यापीठात गिर्यारोहक इन्स्टिट्यूटची निर्मिती करण्याबाबत विचार करण्याच्या दृष्टीने आपला प्रस्ताव सदर विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येत आहे”, असं या पत्राच्या उत्तरात म्हटलं आहे.