अण्णा हजारे यांचे नाव आणि गांधीजींचा वेष या आविर्भावात खांद्यावर तिरंगा झेंडा घेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर सडेतोड आरोप करणारे अपक्ष उमेदवार मनोहर आनंद पाटील मतदारसंघात चच्रेचा विषय ठरत आहेत.
रणरणत्या उन्हात कमरेभोवती गांधीजींप्रमाणे धोतर गुंडाळून अनवाणी चालत पाटील यांची प्रचारफेरी सुरू आहे. आपण गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन मार्गक्रमण करीत आहोत. भ्रष्टाचारमुक्त सर्वागीण विकास हा मुद्दा घेऊन मतदारांना विजयी करण्याचे आवाहन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सलग बोलण्याचे कौशल्य, अभिनयाचा बाज यामुळे ते ज्या ठिकाणी थांबतात, तेथे आपसूकच लोकांची गर्दी होते. लोक मोठय़ा प्रमाणात आपल्याला समर्थन देत असल्यामुळे डॉ. पाटील यांचे निकटवर्तीय दडपशाही करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉ. पाटील यांच्या गुंडांकडून प्रचारात अडथळा आणला जात असल्याची तक्रारही त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी दुचाकीवर बळजबरीने बसवून आपल्या अपहरणाचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. अण्णा हजारे उस्मानाबादेत डॉ. पाटील यांच्याविरोधात आल्यानंतर त्यांच्यासोबत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गांधीजींच्या वेषात अपक्षाचा पद्मसिंहांच्या विरोधात प्रचार!
अण्णा हजारे यांचे नाव आणि गांधीजींचा वेष या आविर्भावात खांद्यावर तिरंगा झेंडा घेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर सडेतोड आरोप करणारे अपक्ष उमेदवार मनोहर आनंद पाटील मतदारसंघात चच्रेचा विषय ठरत आहेत.
First published on: 08-04-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent proneness against padamsinh patil in costume of gandhiji