कराड : देशभर दिमाखात साजरा होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यावर विजेच्या लेसर किरणांद्वारे “आझादी का अमृत महोत्सव” यास त्या अनुषंगाने दृश्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत. महाराष्ट्राची वरदायिनी अशी ओळख असलेल्या कोयना धरण्याच्या दरवाजातून सध्या पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी धरणाच्या भिंतीवरून फेसाळत कोयना नदीकडे झेपावत असताना कोयना धरण प्रशासनाने याचा सुरेख वापर करुन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाचा नकाशा, नाव, आझादी का अमृत महोत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र अशी दृश्ये लेसर किरणांचा वापर करुन या पाण्यावर साकारली आहेत. रात्रीच्या अंधारात ही दृश्ये अतिशय खुलून दिसत आहेत आणि याची चित्रफित कोयना धरण प्रशासनाने समाज माध्यमांवर प्रदर्शित केली आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळत हा सुखद अनुभव घेत या उपक्रमाचे लोकांकडून कौतुकही होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा