औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. इम्तियाज जलील हे औरंगाबादमधील एमआयएमचे एकमेव आमदार आहेत.
जलील यांनी थेटपणे देशातील निवडणूक आयोगाला आव्हान देत भारतातील निवडणूक प्रक्रिया बोगस म्हटले आहे. मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केले. निवडणूक आयोग आता माझे म्हणणे ऐकत असेल तर मी सांगू इच्छितो की, देशातील निवडणूक प्रक्रिया बोगस आहे. संपूर्ण औरंगाबादमध्ये मोठ्याप्रमाणावर बोगस ओळखपत्रांच्या आधारे मतदान केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. २००-२००च्या गठ्ठ्याने ही ओळखपत्रे तयार केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. मतदानाच्या दिवशीच अशाप्रकारचे वक्तव्य केल्यामुळे जलील यांनी टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याशिवाय, औरंगाबाद शहरात मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचे वाटप झाल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा