नौदलाच्या अधिकाऱ्यांनी राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची आज पाहणी केली. याबाबत लवकरच एक स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार असून हा अहवाल नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
नौदल दिनाच्या निमित्ताने भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण येथे उभारण्यात यावा अशी भारतीय नौदलाची योजना होती. या योजनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नौदलाने सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राजकोट येथे तब्बल पाच कोटी रुपये खर्चून किल्ल्याचे नुतनीकरण केले आणि त्यात १५ फूट उंच चबुतऱ्यावर २८ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. हा पुतळा उभारण्यासाठी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती.
पुतळा उभारण्याच्या कामात शासनाशी समन्वयक म्हणून लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील व कमांडर सुशील कुमार राय यांनी काम पाहिले होते. याच अधिकाऱ्यांनी मंगळवारी राजकोट कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. या पाहणीबाबत प्रसार माध्यमांपासून गुप्तता पाळण्यात आली होती.
मंत्री केसरकर यांच्याशी नौदल अधिकाऱ्यांची चर्चा
राजकोट येथील कोसळलेल्या शिव पुतळ्याची पाहणी केल्या नंतर नौदल अधिकाऱ्यांनी मालवण तहसील कार्यालय येथे मंत्री दीपक केसरकर यांच्याशी एकंदरीत परिस्थिती बाबत बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान या चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. घटनेची पाहणी अंती वरिष्ठांना त्याबाबत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर, काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार निलेश राणे यांनी राजकोट किल्ल्यावर भेट दिली. उद्या बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट देऊन पाहणी करणार आहेत असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले आहेत. महायुतीच्या विरोधात टिका केली जात आहे.