IRCTC Ayodhya To Vaishno Devi Tour: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC (IRCTC) भारतातील विविध राज्ये आणि धार्मिक स्थळांसाठी अनेक प्रकारचे टूर पॅकेज घेऊन येते. तुम्हाला अयोध्या आणि वैष्णोदेवी या दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल तर IRCTC तुम्हाला एक जबरदस्त संधी देत ​आहे. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही दोन्ही ठिकाणी अतिशय कमी खर्चात प्रवास करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११ दिवसांचे हे विशेष पॅकेज

अयोध्या राम मंदिर ते वैष्णो देवी पॅकेज हे संपूर्ण १० रात्री आणि ११ दिवसांचे पॅकेज आहे. आसाममधील दिब्रुगड येथून त्याची सुरुवात होईल आणि भारत गौरव टुरिस्ट ट्रेन येथून निघेल. यानंतर तुम्ही मारियानी, लुमडिंग, गुवाहाटी, न्यू कूचबिहार, न्यू जलपाईगुडी आणि कटिहार स्थानकांवरून प्रवास करू शकाल. या सर्व स्थानकांवर प्रवाशांना बोर्डिंग/डिबोर्डिंग सुविधा मिळेल.

हेही वाचा – चार दिवस फिनलँडमध्ये फिरा, आनंदी कसे रहावे शिका सर्व काही मोफत! फक्त अट इतकीच आहे की…

कुठे मिळेल प्रवासाची संधी

या ट्रेन टूरद्वारे तुम्ही अयोध्येतील राम मंदिर आणि हनुमानगडला भेट देऊ शकाल. याशिवाय कटरा येथील श्री माता वैष्णो देवीच्या दर्शनाची संधी मिळेल. याशिवाय तुम्हाला प्रयागराजचा त्रिवेणी संगम आणि अलोपी देवाच्या मंदिराला भेट देण्याची संधी मिळेल. तुम्ही ट्रेनने बनारसच्या काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट देऊ शकाल.

हेही वाचा – आता रेल्वेच्या डब्यांमध्ये मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; अंधेरी, बोरिवली स्थानकावर सुरु होणार रेस्टॉरंट-ऑन-व्हील

किती असेल शुल्क

अयोध्या ते वैष्णो देवी दरम्यान लक्झरी ट्रेन प्रवासाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही २७ मे २०२३ ते ५ जून २०२३ पर्यंत प्रवास करू शकता. या प्रवासाची एकूण दोन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिले इकोनॉमी आणि दुसरे स्टँडर्ड. इकोनॉमीचे भाडे प्रति व्यक्ती २०,८५० रुपये आहे. त्याच वेळी, स्टँडर्डसाठी ३१,१३५ रुपये शुल्क भरावे लागेल. या ट्रेनमध्ये बुक करण्यासाठी, तुम्हाला IRCTC वेबसाइट http://www.irctc.co.in/nget ला भेट द्यावी लागेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway irctc offers tour package from ayodhya to vaishno devi know details about tour fees and date snk
Show comments