Holi Special Train Schedule : कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची आता गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कोकणात बहुतांश मंडळी रेल्वेमार्गे जातात. कोकणरेल्वेवरील सर्वच रेल्वेगाड्या होळीच्या निमित्ताने तुडूंब भरून वाहतात. मध्य आणि कोकण रेल्वेने सोडलेल्या अतिरिक्त वा विशेष गाड्यांनाही आता चांगला प्रतिसाद मिळू लागला असून विशेष गाड्यांचीही तिकिटे जवळपास संपत आल्या आहेत. त्यामुळे होळीनिमित्त मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत.
तारीख | रेल्वे गाडी | सुटण्याची वेळ | एकूण स्थानकं | पोहोचण्याची वेळ |
६ मार्च आणि १३ मार्च | गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वेगाडी | सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.२० | दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम | दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता मडगाव येथे |
१३ मार्च आणि २० मार्च | गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव | लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता | ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी | दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथे |
६ मार्च आणि १३ मार्च | गाडी क्रमांक ०११५२ मडगाव – सीएसएमटी | मडगाव येथून दुपारी २.१५ वाजता | थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे आणि दादर | त्याच दिवशी मध्यरात्री ३.४५ वाजता |
१४ मार्च आणि २१ मार्च | गाडी क्रमांक ०११३० मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस | मडगाव येथून दुपारी १.४० वाजता | करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे | पहाटे ४.०५ वाजता |
या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण २४ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्याही धावणार
विशेष रेल्वेगाड्यांची तिकीटेही संपत असून आता गर्दीचा भार विभाजित करण्यासाठी जादा विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. उधना जंक्शन-मंगळुरू दरम्यान जून महिन्यापर्यंत विशेष रेल्वेगाडी धावणार आहे. होळी आणि उन्हाळी हंगामादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
या विशेष रेल्वेगाड्यांसाठी विशेष शुल्क आकारले जाणार आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ उधना जंक्शन – मंगळुरू जंक्शन – उधना जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी धावेल. गाडी क्रमांक ०९०५७ उधना जंक्शन – मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष २ मार्चपासून सुरू झाली आहे. ही रेल्वेगाडी २९ जूनपर्यंत धावेल. ही रेल्वेगाडी दर बुधवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता उधना जंक्शन येथून निघेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.