नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला आहे. पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप अस्पष्ट आहे.

४ डिसेंबर २०२३ ला उभारण्यात आलेला पुतळा कोसळला

नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केलं होतं. इतिहासकार इंदजित सावंत ( Indrajit Sawant ) यांनीही हा पुतळा कोसळल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

eknath shinde Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Rajkot Fort Malvan Sindhudurg
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Kiran Mane News
Kiran Mane : “भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत..”; किरण मानेंचा संताप
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
torture trainee nurse Ratnagiri, Ratnagiri nurse,
रत्नागिरीत प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकेवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Sindhudurga Raj Thackeray Reacts
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, “ही व्यवस्था…”
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Rajkot Fort Malvan Sindhudurg supriya sule ekneth shinde
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “तो पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्याचा”, सुप्रिया सुळेंचा आरोप; एकनाथ शिंदे प्रत्युत्तर देत म्हणाले…

काय आहे इंद्रजित सावंत यांची पोस्ट?

जलदुर्ग सिंधूदुर्गा शेजारी जंजिरे राजकोट वर उभारलेला शककर्ते शिवाजी महाराजांचा पुतळा पडला!!! गडपती शिवरायांनी खळाळत्या समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग साडेतीनशे वर्षानंतरही आपले अस्तित्व टिकून आहेत. त्यांचा चिराचिरा शिवाजी महाराजांच्या आणि हे गड किल्ले बांधणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत आहेत. पण आज सिंधुदुर्ग शेजारी असणाऱ्या राजकोट या जलदुर्गावर भारतीय नौदलामार्फत बसवला गेलेला आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा हा एक वर्षभराच्या आतच धाराशाही झालेला आहे. हा पुतळा बसवला त्याचवेळी माझ्यासारख्या अभ्यासकाने या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल आणि याच्या मजबुतीबद्दल आक्षेप घेतला होता. हा पुतळा शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नाही. याबद्दलही त्यावेळेला आम्ही पोस्ट लिहून लोकांसमोर आलो होतो. पण याकडे संबधितांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर ३-४ फेब्रुवारी २०२४ ला मी या पुतळ्याला भेट दिली होती. आणि त्यावेळीही हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही. हे शिल्प बदलावे असे निरीक्षण नोंदवले होते. असं इंद्रजित सावंत ( Indrajit Sawant ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा Vijay Wadettiwar : “महायुतीचा भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर”; शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल; म्हणाले…

शिवरायांचं स्मारक घाईगडबडीत उभारल्याचा आरोप

पुणे सावंत ( Indrajit Sawant ) म्हणतात, खरंतर नौदलासारख्या प्राख्यात आस्थापनेने केलेले काम हे चिरंतन व्हायला पाहिजे; इतकं ते मजबूत आणि सुंदर असायला हवं होत. भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील, ती आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल.तर त्याच्या मजबुती कडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे की नाही? शिवछत्रपतींचे स्मारक हे घाईगडबडीत तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता. पण हे करत असताना या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबुतीकरण याच्याकडे दुर्लक्ष झालं. आज संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीचं शिवछत्रपतींचे स्मारक हे जमीनदोस्त झालेलं पाहून भारताची – भारतीय नौदलाची काय प्रतिमा झाली असेल! याचा आपण विचार करावा. आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण घेत असताना शिवाजी महाराजांचे भले उंच पुतळे तयार करून आणि ते पुतळे कालांतराने असेच पडणार असतील तर अशी स्मारके आपण उभी करावीत का? याचाही शिवप्रेमीनी विचार करावा. हा पुतळा तयार करण्यासाठी आणि हा पुतळा मंजूर केला त्या एजन्सी आणि पुतळा बसवणारे यांच्या हेतू विषयी आता आपल्याला शंका घेण्यास जागा आहे. ज्यांनी हा अपराध केला त्यांना आपण शिक्षा करणार आहोत का ????
इंद्रजित सावंत ( Indrajit Sawant )

अशी पोस्ट इंद्रजित सावंत ( Indrajit Sawant ) यांनी लिहिली आहे. आता छत्रपती शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने विरोधकांच्या हाती आणखी एक मुद्दा लागला आहे.