रत्नागिरी : औद्योगिकदृष्ट्या मागे गेलेला महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आणून राज्य एक नंबरला आणण्याचे काम गेल्या अडीच वर्षात करण्यात आले आहे. औद्योगिकदृष्ट्या हा महाराष्ट्र एक नंबरलाच राहील असे काम करणार असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्याचे उद्योग मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आमदार उदय सामंत त्यांचे रत्नागिरीतील पाली या गावी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी पुष्पवृष्टी करून त्यांच्या आईने आमदार सामंत यांचे औक्षण केले. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सामंत म्हणाले की, रत्नागिरीतील जनतेने मला सलग पाच वेळा आशीर्वाद दिले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकून उद्योगमंत्री पदाची पुन्हा जबाबदारी दिली आहे. ती यशस्वी पार पाडणार आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र एक नंबरला आला आहे. औद्योगिक विकासामध्ये महाराष्ट्र हा एक नंबरलाच राहील असे काम माझ्याकडून घडेल. गडचिरोली पासून कोकणापर्यंत अनेक प्रकल्प आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. २५ ते ३० हजार करोड रुपयाचे प्रकल्प नावारूपाला येत आहेत. लहान उद्योजकांपासून मेगा अल्ट्रा प्रकल्प उद्योजकांपर्यंत सर्वांना सामावून घेऊन काम करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाचे असल्याचे सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे खातं माझ्याकडे आले आहे. त्याला योग्य न्याय देण्याचे काम माझ्याकडून होणार आहे. या खात्यामार्फत वाङ्मयी पुरस्कार देण्यात येतात. त्यामुळे तालुकास्तरावर चांगले उपक्रम राबवण्याचे काम या खात्यामार्फत केले जातील. तसेच जास्तीत जास्त व्यवहारांमध्ये या महाराष्ट्राच्या मातृभाषेचा वापर झाला पाहिजे यासाठी वार्षिक आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”

u

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे पुन्हा उद्योग मंत्री झाल्याने त्यांचे महायुतीतर्फे रत्नागिरी शहरातून भव्य स्वागत रॅली काढण्यात आली. शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार अशी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राजापूर तालुक्यातील बारसू नाणार रिफायनरी प्रकल्प स्थानिक आमदारांनी म्हटल्याप्रमाणे रद्द होईल. या प्रकल्पाला स्थानिक लोकांच्या विरोध असल्याने उद्या मंत्री म्हणून आपण स्थानिक लोकांच्या बाजूने निर्णय घेऊ. त्याबाबत कोणीही राजकारण करण्याची गरज नाही, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Atul Save : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत अतुल सावेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तो निर्णय आम्हाला मान्य असेल”

रत्नागिरीतील मिऱ्या एमआयडीसी प्रकल्प हा राज्य शासनाच्या दृष्टीने रद्द करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा विषय संपला अजून ज्यांनी या प्रकल्पाबाबत राजकारण केले त्यांना जनतेने धडा शिकवला आहे. स्थानिक लोकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प राज्य शासनाने रद्द झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे आपण मिऱ्या वासियांना दिलेले आश्वासन पूर्ण केले असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

Story img Loader