रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटातील नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत असताना, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. हीच बाब हेरून जाधव यांना रत्नागिरीचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटात येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

हेही वाचा >>> ‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय

राज्यात शिवसेनेच्या फुटीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेत दोन गट पडले. जिल्ह्यातील खेड-दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर राहीले. मात्र एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेची आता काँग्रेस होत असल्याचे वक्तव्य करून आमदार जाधव यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवले आहे. त्यांच्या या नाराजीचा फायदा उठवण्याचे काम शिंदेच्या शिवसेनेकडून सुरू झाले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांना शिंदेच्या शिवसेनेत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. जाधव यांनी हा प्रस्ताव स्वीकारल्यास शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Story img Loader