नांदेड: महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यातील युवकांचा रोजगार, त्यांचे भवितव्य हिरावून घेत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केली. महाराष्ट्रातील  टाटा – एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये अचानक कसा गेला हे कोणालाही कळले नाही. ‘वेदांन्त  फॉक्सकॉन’चा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयांची गुंतवणुकही गेली व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिसकावून घेतले.  नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर एमआयडीसी येथील आजच्या दिवसातील भारत जोडो पदयात्रेच्या संध्याकाळच्या  सभेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 देशातील तरुण लष्करात भरती होऊन देशसेवा करू पहात आहे पण नरेंद्र मोदींनी त्यावर पाणी फिरवले आहे फक्त चार वर्षेच सेवा करा आणि घरी बसा अशी व्यवस्था करून ठेवली आहे, अशी त्यांनी मोदींच्या धोरणाचा समाचार घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industry out narendra modi future of the youth of maharashtra criticism of rahul gandhi ysh
Show comments