खर्डा (ता.जामखेड) येथील नितीन आगे या दलित या तरुणाच्या हत्येचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार जयंत ससाणे यांनी तीव्र निषेध केला आहे. आगे कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या संदर्भात निवेदन देणार असल्याचे ससाणे यांनी सांगितले.
खर्डा येथील दलित युवक नितीन आगे याची निर्घृण हत्या करण्यात आली. याबाबत जिल्हा काँग्रेसने दु:ख व्यक्त करून काँग्रेस पक्ष कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ससाणे यांनी म्हटले. नितीनच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईत भेट घेऊन यासंदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देणार असल्याचे ससाणे यांनी म्हटले. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री मुधकर पिचड, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली असून आगे कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inhibition of kharda atrocity case from sasane
Show comments