आयएनएस विक्रांत जहाजासंदर्भात झालेल्या ५७ कोटींच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे. या घोटाळ्यामधील ५७ कोटी रुपये नेमके कुठे गेले याबद्दल सोमय्यांनी खुलासा करावा अशी मागणी करत राऊत यांनी सोमय्यांना देशद्रोही म्हटलं आहे. असं असतानाच आता राऊत आणि सोमय्या यांचा एका जुना फोटो भाजपाकडून शेअर करण्यात आलाय. हा फोटो शेअर करत संजय राऊतांचा ‘नॉटी दांभिकपणा’ उघड झाल्याचा टोला लगावण्यात आलाय.
नक्की वाचा >> “आता सोमय्या राजभवनाच्या मागेही ईडी लावणार का?”, शिवसेनेचा सवाल; महाराष्ट्राला फडणवीसांची कीव येत असल्याचाही टोला
२०१३-१४ साली विक्रांत जहाजाचं संवर्धन करण्यासंदर्भात शिवसेना आणि भाजपाचे प्रयत्न सुरु होते. यावेळी शिवसेना आणि भाजपाची युती असल्याने दोन्ही पक्षांचे तत्कालीन खासदार तत्कालीन राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांना भेटले होते. याच भेटीसंदर्भातील फोटो किरीट सोमय्या यांनी २० डिसेंबर २०१३ रोजी ट्विटरवरुन पोस्ट केलेला. हाच फोटो आता व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सोमय्यांसोबतच संजय राऊत, अनिल देसाई, अनंत गिते, गोपीनाथ मुंडे हे नेतेही दिसत आहेत.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: “…तर महाविकास आघाडी सरकार अस्थिर होईल”; मोदींसोबतच्या भेटीनंतरच शरद पवारांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
फोटोला कॅप्शन काय?
“आयएनएस विक्रांत सध्या वाचवण्यात यश आलंय. जहाज भंगारात काढण्याचं कंत्राट २९ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आलंय. आम्ही विक्रांतला वाचवण्याचे प्रयत्न सुरु ठेवणार आहोत. तुम्ही सुद्धा पाठिंबा द्या,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आलीय.
नक्की वाचा >> सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..”
आता कोणी शेअर केलाय हा फोटो?
मुंबई भाजपाचे सचिव अॅडव्हकेट विवेकानंद गुप्ता यांनी या जुन्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत राऊतांवर निशाणा साधलाय. “आयएनएस विक्रांत प्रकरणी संजय राऊत यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अनंत गिते आणि इतर शिवसेनेचे नेतेही होते. या नॉटी भूमिकेचा दांभिकपणा उघडा पडलाय,” असा टोला गुप्ता यांनी लागावला आहे.
नक्की वाचा >> शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा राऊत अधिक महत्वाचे वाटतात का? MIM च्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “काहीजण अशा…”
दरम्यान, सोमय्या यांनी राऊतांनी केलेले आरोप फेटाळून लावले असून यासंदर्भातील कागदपत्रं दाखवण्याचं आव्हान सोमय्यांनी केलंय.