नितीन बोंबाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जव्हार व मोखाडा येथील १७ संकलन टाकींच्या कामांच्या तांत्रिक व वित्तीय तपासणीसाठी तीनसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. १७ संकलन टाकींच्या कामांची परिपूर्ण तांत्रिक आणि वित्तीय बाबींची तपासणी करून पाणीपुरवठा योजनेविषयी जिल्हा परिषदेला ३० सप्टेंबपर्यंत अहवाल सादर करायचा आहे.

या त्रिसदस्यीय समितीत ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता मनीष भामरे, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी मनोज पवार आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या अनिता कुलकर्णी-देशमुख यांची नेमणूक करण्यात आली.

२०१७-१८ वर्षांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या ३० मार्च २०१८ च्या आदेशानुसार जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील पाणीटंचाई क्षेत्रातील १७ गावांत ‘प्रीफॅब्रिकेटेड मेटॅलिक टँक’ बसविण्याच्या कामास अडिच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांनी मंजूर केलेल्या कामांची तांत्रिक गुणवत्ता राखण्याची आणि योग्यता तपासण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा यांची होती. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांच्या मान्यतेने १७ कामांची निविदा प्रक्रिया २६ एप्रिल ते १५ मे २०१८ या कालावधीत करण्यात आली. या सर्व निविदांना राजू बोरसे, रचना इंजिनीअर्स, मे. नितेश मालवाणी या निविदाधारकांनी निविदा भरलेल्या असून एकूण १७ पैकी १६ निविदांना राजू बोरसे हे तर एका निविदेकरिता रचना इंजिनीअर्स हे पात्र ठरले. या लोकोपयोगी योजनेच्या कामाबाबत एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या कामांबाबत जेथे एकच ठेकेदार काम करीत असताना क्षेत्रीय अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी कामाकडे दुर्लक्ष केले. प्रत्यक्ष क्षेत्र भेट न करताच मापे नोंदवली गेली.

नमुन्यादाखल आसे ग्रामपंचायतअंतर्गत करण्यात आलेल्या टाक्यांची १२ जुलै २०१९ रोजी पाहणी केली असता टाकीत गळती असल्याने पाणी साठलेले नव्हते. तर अन्य टाक्यांत निकृष्ट साहित्य वापरल्याने योजना सदोष ठरल्याचे ‘लोकसत्ता’त  वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या प्रकरणी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या शुभांगी कुटे यांनी तक्रार केली होती.

खर्च होऊनही योजना अयशस्वी

* जव्हार तालुक्यातील जुनी जव्हार गोडपाडा, पाथर्डी डोंगरवाडी, श्री हाळे खुर्द, बिऊलधार येथे प्रत्येकी एक लाख लिटर पाणी संकलन टाकी बसविणे, हाथेरी नवापाडा येथे दीड लाख लिटर पाणी संकलन टाकी बसविणे, काशिवली तडापाडा येथे दोन लाख लिटर पाणी संकलन टाकी बसविणे या पाच कामांचा समावेश आहे.

* मोखाडा तालुक्यात गोमघर बनाची वाडी, आसे भोईरपाडा, पोशेरा निवळेपाडा, आसे वर्धापाडा येथे प्रत्येकी दीड लाख लिटर पाणी संकलन टाकी बसविणे. नाशेरा कु वारीपाडा, सयादे आंधेरवाडी, मौजे गोमघर डोंगरवाडी, बेरिस्ते जांभळीपाडा येथे प्रत्येकी एक लाख लिटर पाणी संकलन टाकी बसविणे. सूर्यमाळ वांगणपाडा येथे एक लाख लिटर, काष्टी वडपाडा येथे (१.५० लक्ष लिटर), मोरांडा काकडपाडा येथे (२.०० लाख लिटर), आसे तुंगारवाडी येथे (१.५० लाख लिटर) पाणी संकलन टाकी बसविणे इत्यादी १२ कामांचा समावेश आहे. योजना अयशस्वी झाल्याने शासकीय निधी खर्च करूनही जव्हार, मोखाडय़ातील टंचाईग्रस्त गावे वंचित आहेत.