वाई: कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी साताऱ्यातील नीरा दत्त घाट ते लोणंद, तरडगाव येथील पालखी तळ व पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण परिसर, फलटण ते बरड पालखीतळ या मार्गाची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर आदी अधिकारी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कालावधीत कायदा सुव्यवस्था व वाहतूक सुरळीत रहावी यासाठी पोलीस प्रशासन काटेकोरपणे दक्ष असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…

आणखी वाचा-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली, पोलीस कुचकामी- आ. गाडगीळ

सुनील फुलारे आणि पालखी मार्गाची पाहणी केली यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पोलीस महानिरीक्षकांनी आज साताऱ्यातील नीरा दत्त घाट ते लोणंद, तरडगाव, फलटण बरड पालखीतळ या मार्गाची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर फलटणचे पोलीस उपाधीक्षक राहुल धस फलटण फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे फलटण पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात १८ जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा येणार आहे. यावेळी वारकऱ्यांना व भाविकांना चालताना कोणतीही अडचण येऊ नये या कालावधीत वाहतूक ही सुरळीत राहावी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येऊ नये यासाठी या परिसरातील अधिकाऱ्यांशी आपण सतत संपर्कात आहोत असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ; पाकिस्तानला धडकणार, कोकण किनारपट्टीला किती धोका?

पालखी सोहळा मार्गामध्ये कोणाला काही अडचण आल्यास त्यांनी ताबडतोब पोलिसांची प्रशासनाशी संपर्क साधावा. यासाठी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे प्रशासनाचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देणार असल्यास देण्यात येणार असल्याचे फुलारी यांनी यावेळी सांगितले. पालखी मार्गावर असणाऱ्या पालखीतळावर अनेक ठिकाणी वीज वितरण वाहिन्याच्या वाहिन्यांवर आकडे टाकून वीज घेतली जाते यामुळे मोठी दुर्घटना घडण्याचीही शक्यता असते त्यामुळे याबाबत आपण महावितरणची चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader