ललित पाटील प्रकरणावरून राज्यातील ड्रग्स विक्री आणि पुरवठ्याचं गांभीर्य अधोरेखित झालं आहे. ड्रग्सची विक्री आणि पुरवठा तत्काळ थांबवण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली आहे. विधान परिषदेतही यावर काल (१२ डिसेंबर) चर्चा झाल. सत्ताधारी आणि विरोधकांनी यावर आपली मते आणि समस्या मांडून सरकारने यावर आळा घालावा अशी मागणी केली. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या काही दिवसांत ड्रग्सची विक्री ऑनलाईनरित्या केली जात असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.इन्स्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे अंमली पदार्थांचं ऑनलाईन मार्केट झालं आहे. येथून अंमली पदार्थांची विक्री केली जात असून युपीआयद्वारे यासाठी व्यवहार केला जातो. तर, याचा पुरवठा खासगी कुरिअरद्वारे केला जात असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
दरम्यान, ड्रग्सचा व्यवहार झाल्यानंतर तो पुरवण्यासाठी खासगी कुरिअर कंपन्यांची मदत घेतली जाते. त्यामुळे कंपन्यांनी कुरिअर सेवा देताना ड्रग्सची डिलिव्हरी करू नये, असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिला. त्यामुळे, या कंपन्यांनी या पार्सल्सची छाननी करूनच त्यांची सेवा पुरवली पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
“एकप्रकारे जागतिक स्तरावर अंमली पदार्थांचं षडयंत्र सुरू आहे. मागच्या काळात आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले ड्रग्स सापडले आहेत. त्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे. मेड इन पाकिस्तानचे पॅकिंग होतं आणि त्यात ड्रग्स होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांची आणि डिजींची बैठक घेतली होती. त्यांनी यावेळी डेडिकेटेड एजन्सींना मदत करण्यास सांगून व्यवस्था सुरू करण्यास सागितलं आहे. यामुळे राज्यांतर्गत इंटेलिजन्स शेअरिंग सुरू झालं आहे. राज्यात रोज आपण कुठे ना कुठे छापा मारतो. ड्रग्सच्या फॅक्टरी तयार केल्या आहेत, ते बंद करतो. ललित पाटीलने अशाचप्रकारे काही लोकांना केमिस्ट वगैरेंना धरून २०२० मध्ये फॅक्टरी चालू केली. त्यानंतर तो पकडला गेला. त्यानंतर काय घडलं ते माहित आहे. मला असं वाटतं की आता यासंदर्भात कुठेही कोणालाही सरकार पाठिशी घालणार नाही आणि घालू देणार नाही. कारण, आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे. हा एक प्रकारचा अटॅक आहे. याविरोधात अतिशय कडक मुकाबला झाला आहे. या केसमध्ये ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना ३११ खाली डिसमिस करून टाकलं आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचाही सहभाग मिळाला की त्यांना थेट डिसमिस केलं जाईल, असा इशाराही फडणवीसांनी दिला.
दरम्यान, ललित पाटील प्रकरणात चार पोलिसांना कार्यमुक्त करण्यात आलं असून सहा जणांना निलंबित केलं आहे. तसंच, या प्रकरणात आणखी कोणी पोलीस सहभागी असल्याचं निदर्शनास आल्यानंतर संबंधित पोलिसांना निलंबित करण्याएवजी कार्यमुक्त केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.