पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदीमधून तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीबरोबर लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. अवघ्या महाराष्ट्रातून या वारीसाठी वारकरी येत असतात. निर्मल वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या स्वच्छतागृहाचा विषय मार्गी लावला जातो. यावर्षी ब्लॅक लिस्ट कंपनीला ठेका दिल्याने इतर ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. प्रत्येक्षात ५ हजार ५०० मोबाईल शौचालयांची गरज असताना केवळ दोन ते अडीच हजार शौचालये संबंधित कंपनीने दिल्याने ठेकेदारांनी प्रश्न उपस्थित केला असून संपूर्ण प्रक्रियेप्रकरणी रविराज लायगुडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी आळंदी आणि देहूतुन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. त्यांच्या सोयीसाठी निर्मल वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांना प्रातविधीसाठी मोबाईल शौचालये जागोजागी उपलब्ध करून दिली जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील हे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलं आहे ती ब्लॅकलिस्ट असल्याचा आरोप याचिकाकर्ते रविराज लायगुडे यांनी केला आहे. रविराज लायगुडे म्हणाले, तुळजापूर येथे ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपनीला काम देण्यात आलं आहे. सध्या आळंदी, देहूवरून पंढरपूरला जाणाऱ्या वारीतील वारकऱ्यांसाठी ५ हजार ५०० शौचालयांची गरज आहे. संबंधित कंपनीने २ हजार पेक्षा अधिक शौचालये आत्तापर्यंत दिलेली नाहीत. आता ही वारी कशी होणार याकडे आमचं लक्ष आहे. काळ्या यादीत असलेल्या कंपनीला कंत्राट दिले हे आमच्या लक्षात आलं नाही. राजकीय दबावातून हे कंत्राट त्यांना दिल्याची शक्यता आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, उच्च न्यालयाने संबंधित प्रक्रियेबाबत चौकशी अहवाल मागितला आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
“पंढरपूर वारीसाठी मोबाईल शौचालये जिल्हा परिषद प्रशासनामार्फत मिळाली आहेत. संबंधित विभागाकडून माहिती घेऊन देतो. काही वर्षांपासून बघितलं तर नऊशे शौचायले पुरेशी होती. यावर्षीय वाढ करून पंधराशे शौचालये घेतलेली आहेत.” -कैलास केंद्रे- आळंदी नगरपरिषद सीईओ