वाई: मराठा समाजासोबत आजवर प्रत्येक नेत्याने केवळ मतांचे राजकारण केले आहे. या समाजास आरक्षण देण्याचे काम केवळ देवेंद्र फडणवीस यांनीच केले. तशी नियत केवळ याच नेत्याकडे आहे. त्यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले, जे पुढे आघाडीच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही. यापुढेही मराठा समाजाला आरक्षण फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात.
दुसरे कोणीही नाही, असे स्पष्ट मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की मराठा समाजातील मुला-मुलींना आरक्षणाची गरज आहे. फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. पुढे हे आरक्षण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी उच्च न्यायालयात टिकवले. परंतु जे पुढे आघाडीच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही.
हेही वाचा >>> सांगली: पंकजा मुंडेंच्या दौऱ्यावेळी इस्लामपुरात नियोजनाचा गोंधळ
आज जे अन्य राजकीय नेते या प्रश्नावर राजकारण करत आहेत, ते केवळ मतांसाठी सुरू आहे. यातील एकही नेता समाजासाठी, या आरक्षणासाठी काहीही करणार नाही. हे आरक्षण देताना खूप विचारपूर्वक धोरणे राबवावी लागणार आहेत. ती राबवताना त्यातील प्रामाणिकपणा आणि नियत केवळ फडणवीस यांच्याकडे आहे. अन्य नेत्यांना यावर केवळ राजकारण करत समाजाला भडकवत ठेवायचे आहे. यापुढेही हे गेलेले आरक्षण फक्त फडणवीसच देऊ शकतात. दुसरे कोणीही नाही, असे स्पष्ट मत शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केले.